स्मार्टफोनवर चालणारा एलईडी बल्ब भारतात दाखल

iota
इंडियन स्टार्टअप क्यूब २६ ने मोबाईल अॅपने ऑपरेट करता येणारा बल्ब बाजारात आणला आहे.आयओटा लाईट नावाने हा एलईडी बल्ब विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जात आहे व त्याची किंमत आहे १४९९ रूपये. ६ नोव्हेंबरपासून तो फ्लिपकार्टवर विक्रीसाठी लिस्ट होत आहे.

क्यूब २४ चे सहसंस्थापक व सीईओ सौरव कुमार म्हणाले, या बल्बच्या माध्यमातून आम्ही भारताच्या आयओटी क्षेत्रात पाऊल टाकले आहे. स्मार्ट होम कन्सेप्ट यशस्वी होण्यात लायटिग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. हा बल्ब १५ हजार तास चालेल शिवाय यात १६० लाख कलर्सचा चॉईस ग्राहकांना मिळणार आहे. बल्ब वापरण्यासाठी ग्राहकाला कंपनीचे अॅप स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करावे लागेल. अॅप बल्बला कनेक्ट केल्यानंतर १६० लाख कलर्समधून ग्राहक त्यांच्या आवडीचा रंग निवडू शकेल व त्या रंगाचा प्रकाश बल्ब देईल.

या बल्बमध्ये कॉल, एसएमएस अॅलर्ट हे इंटरेस्टींग फिचरही दिले गेले आहे. कॉल अथवा एसएमएस आला तर बल्बचा रंग बदलेल. त्यामुळे फोन सायलेंट मोड वर असला किवा तुम्ही गोंगाटाच्या ठिकाणी असलात तरीही कॉल येतोय किवा एसएमएस आल्याची सूचना मिळेल

Leave a Comment