भुरळ पाडणारे सर्वात सुंदर १० विमानतळ

[nextpage title=”भुरळ पाडणारे सर्वात सुंदर 10 विमानतळ “]
collarge
जग आज प्रचंड वेगाने धावते आहे. कामासाठी पळते आहे, मौजमजेसाठी भटकते आहे, कुटुंबकबिल्याला बरोबर नेते आहे, शिक्षणासाठी दौडते आहे, नोकरीसाठी सुसाट धावाधाव करते आहे, आजारांवर उपचार करून घेण्यासाठीही एकीकडून दुसरीकडे जाते आहे. म्हणजे काय या ना त्या कारणाने लोक प्रवास करत आहेत. आणि महागडे समजले जाणारे विमानप्रवासही आजकाल सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याने या सार्‍या धावण्याला अनोखी गतीही मिळते आहे. बस, रेल्वेसाठी स्थानके असतात व त्यासंबंधातील्या आपल्या कांही कल्पना ठाम असतात.मात्र मुळातच विमान प्रवास ही चैनीची बाब असल्याचे जेथे विमाने थांबणार ते विमानतळ तशाच क्वालिटीचे हवेत याची जाणीव या क्षेत्रात वाढत चाललेल्या स्पर्धेमुळे अनेक देशांना झाली आहे. विमानातून बाहेर पाय पडताच विमानतळाने प‘वाशांनी आनंद द्यावा, विमानतळाची भुरळ प्रवाशांना पडावी यासाठी अनेक डिझायनर्स आपल्या कल्पनांना मूर्तस्वरूपात उतरवित आहेत. स्वच्छ तप्तर सेवेबरोबरच कस्टम चेकअप वेगाने होण्यासाठी सोयी केल्या जात आहेत. सानाम हरविणे, कस्टम चेकसाठी तासनतास रांगेत थांबणे हे प्रकार आता लवकरच इतिहासजमा होतील अशी आशा बाळगायलाही हरकत नाही. प्रथम दर्शनी प्रेमात पाडणार्‍या 10 विमानतळांची ओळख खास आपल्यासाठी

1-New-Zealand’s-Wellington-
1)न्यूझीलंडचे वेलिंग्टन विमानतळ
हा विमानतळ सुंदर म्हणण्यापेक्षा थोडा स्ट्रेंज म्हणजे अधिक योग्य ठरेल. कांही वर्षांपूर्वी अक्षरश: एखाद्या भंगार एस टी स्टँडची कळा असलेला हा विमानतळ आता आवर्जून पाहावा असा बनला आहे.2003 साली येथे लॉर्ड ऑफ द रिंग्ज चित्रपटातील गोलमचे अतिभव्य शिल्प बसविले गेले आणि आठ वर्षांपूर्वी द र्राक नावाने डिपार्चर लाऊंज बांधले गेले. हे लाऊंज म्हणजे दिवसाउजेडी पाहावयाचे जणू स्वप्न अशी त्याची ख्याती आहे.[nextpage title=”2)बजरस एअरपोर्ट माद्रिद”]

2-Madrid’s-Barajas-Airport
दरवर्षी किमान 7 कोटी प्रवासी या विमानतळावर उतरतात आणि जगातला हा सर्वात मोठा विमानतळ आहे.7,60,000 चौरस मीटरच्या परिसरात पसरलेल्या या अवाढव्य विमानतळाचे डिझाईन अँटोनिया लामेला आणि रिचर्ड रॉजर्स यांनी केले आहे. प्रसन्न करणार्‍या पिवळ्या रंगाचा वापर यात केला असून टर्मिनलचे डिझाईनच असे आहे की थकून आलेल्या प्रवासी एकदम रिलॅक्स होतो आणि कांही वेळात ताजातवानाही होतो. इल्युमिनेशनचा कल्पक वापर, काचेच्या भिंती, अनेक घुमट, त्यातून आत झरणारा नैसर्गिक प्रकाश शिवाय स्पा आणि अनेक कलाप्रर्दशने येथे आहेत. ऑथेंटिक स्पॅनिश ब्युटीकही येथे हारीने उभी असून प्रवाशाला आनंद देण्यास तप्तर आहेत.[nextpage title=”3) चांगी एअरपोर्ट सिंगापूर”]

3-Singapore’s-Changi-Airpor
सिंगापूर हा जगातील सुंदर देशांतील एक चिमुकला देश. हा सर्व देशच मुळी विचारपूर्वक डिझाईन करून वसविला गेला आहे. चांगी एअरपोर्टही त्याला अपवाद नाही. अनेक वर्षे जगातील सर्वोत्तम विमानतळांच्या यादीत याचा समावेश होतो आहे. येथे प्रवाशांना रिझविण्यासाठी फुलपाखरांचा बगीचा, पाच मीटर उंचीची ग्रीन वॉल, रूफटॉप पूल, मस्त झोप घेण्यासाठीच्या सुविधा व अनेक बोटॅनिकल गार्डन्स आहेत. प्रवाशांना काही कारणाने विमानतळावर प्रतीक्षा करायची वेळ आलीच तर त्यांचा वेळ कंटाळा न येता आनंदात जावा याची सर्व काळजी येथे घेतली गेली आहे.[nextpage title=”4)इन्चाँग एअरपोर्ट सेउल”]

4-Seoul’s-Incheon-Airport
सर्वोत्तम विमानतळांच्या यादीत अनेक वर्षे स्थान असलेला हा विमानतळ सेवा व सुविधांबाबत परिपूर्ण म्हटता येईल. कमानीच्या आकाराचे डिझाईन त्यासाठी केले गेले आहे. हा कोरियन पारंपारिक घरांचा आभास निर्माण करतो व त्यामुळे येथे आलेल्या प्रवाशांना घरी आल्यासारखाच फिल येतो. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी कॅसिनो, आईस रिंग, स्पा, सौना, आणि जिव्हा तृप्तीसाठी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ पुरविणारी चायनीज, जपानी, पाश्चिमात्य चवीची रेस्टॉरंटस येथे आहेत. येथील लाऊंजमधून दिसणारे दृष्य नजरबंदी करते कारण येथून खाण्यापिण्याचा आनंद लुटताना प्रवासी रनवेवरून उडत असलेली व उतरत असलेली महाकाय विमाने पाहू शकतात.[nextpage title=”5)किंग अब्दुलाझिझ विमानतळ जेद्दा”]

5-Jeddah’s-King-Abdulaziz-A
कस्टम्स बॅगेज व अन्य सुविधाही वातानुकुलीत इमारतीत असलेल्या या विमानतळाचे छप्पर अगदी देखणे आहे. तंबुसारखा आकार त्याला दिला गेला आहे. हा विमानतळ इस्लाम धर्मियांच्या पवित्र मकका या ठिकाणाला अगदी जवळ आहे व त्यामुळे येथे दरवर्षी लक्षावधींच्या संख्येने जगभरातून भाविक येतात. त्यांना योग्य सुविधा मिळाव्यात या दृष्टीने विमानतळाचे डिझाईन होर्स्टबर्जर फर्मने केले आहे. नवीन टर्मिनल मध्ये तंबूचे छप्पर आणि ओपन एअर एअरपोर्ट असून या डिझाईनने अनेक बक्षीसे मिळविली आहेत. कारण या डिझाईनमुळे प्रवाशाचा वाळवंटी तीव‘ सूर्यकिरणांपासून बचाव होतोच पण ओपन एअरमुळे हवेच्या सुखद झुळकांचाही अनुभव घेता येतो.[nextpage title=”6)हाँगकाँग इंटरनॅशनल एअरपोर्ट”]

6-Hong-Kong-International-A
हाँगकाँग हे बेटच मुळी नवलकथेत शोभावे असे आहे. येथील विमानतळाने त्यावरही कडी केली आहे. हा इंटरनॅशनल एअरपोर्ट चक्त समुद्राच्या टोकावर आणि आजुबाजूच्या बेटांच्या गराड्यात आहे. जगातील व्यस्त विमानतळांपैकी एक असलेला हा विमानतळ प्रथम येणार्‍या प्रवाशांना कांही काळ धडकी भरवितो कारण येथे समुद्रात घुसलेल्या निमुळत्या रनवेवर विमान उतरते. थोडीशीही चूक प्रवाशांना थेट समुद्रात नेऊ शकते. मात्र येथील सुविधा अत्युच्च दर्जाच्या आहेत. फूड कोर्टमध्ये चविष्ट पदार्थांची रेलचेल आहे आणि वैमानिकाचा अनुभव घेण्यासाठी एअरपोर्ट फ्लाईट कॅबिन स्टिम्युलेटर ही आहे. आयमॅक्स सिनेमा करमणुकीसाठी सज्ज आहे. विमानतळापासून एक्सप्रेस ट्रेन कांही मिनिटात तुम्हाला सिटीत नेते. रेल्वेत चढण्यापूर्वी संपूर्ण टर्मिनल्सना असलेल्या गेटमध्ये कुठेही बॅग चेकींग व बोर्डिंग पास घेता येतात.[nextpage title=”7) मराकेच एअरपोर्ट सनारा”]

7--Marrakech’s-Menara-Airpo
आधुनिक व पारंपारिक इस्लामी वास्तूरचनेचा उत्तम संयोग असलेला हा विमानतळ मोरोक्कोतील महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळ बनला आहे. प्रचंड मोठ्या मधमाशीच्या पोळ्याच्या आकारात आतील डिझाईन आहे. यातून सूर्यप्रकाश आला की सावल्यांचा नयनमनोहर खेळ अचंबित करतो. जमिनीवरची ही नक्षी पाहताना पायाखालची वाट कधी सरली याचा पत्ताही लागत नाही. याच्या छपरावर 72 फोटोव्होल्टिक पिरॅमिडस असून त्याच्या माध्यमातून विजनिर्मितीही होते. [nextpage title=”8) हेलिसिंकी फिनाव्हिया फिनलंड”]

8-Helsinki’s-Finavia-Airpor
देशातील हा सर्वाधिक व्यस्त विमानतळ कांही वर्षापूर्वीच त्याला अांतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा मिळाला आहे. दरवर्षी दीड कोटीपेक्षा अधिक प्रवासी येथे उतरतात. येथील एकसोएक सुंदर कलादालनांमुळे या विमानतळाने जगाचे लक्ष वेधून घेण्यात यश मिळविले आहे. सोशल मिडीयाचा वैशिष्ठ्यूपर्ण वापर, सुंदर लाऊंज, तेथील अंड्याच्या आकाराच्या खुर्च्या अनुभवाव्यात अशाच. येथील सिनेमाघरात फिनिश शॉर्टफिल्म दाखविल्या जातात. विमानतळाचे टेरेसही अतिशय देखणे आहे. खास करून उन्हाळ्यात सूर्यप्रकाशाची उब घेताना शरीर पुरेसे सैलावते व आराम मिळतो. या विमानतळावरच्या टर्मिनसवर वॉक घेतला तर देशातील कांही चांगली ‘आधुनिक शिल्पे पाहता येतात.[nextpage title=”9)शिकागो ओहेअर विमानतळ”]

9-Chicago’s-O’Hare-Airport
जगातील सर्वाधिक व्यस्त विमानतळ. मात्र डिझाईनप्रेमींसाठी नंदनवन म्हटता येईल असा. येथले मल्टीकलर्ड लाईटस सरकत्या रनवेवर व टर्मिनल्सच्या मध्ये जादू करतात. प्रत्येक सेकंदाला नवीन रंग व त्यामुळे बदलते दृष्य यामुळे नजरबंदी न झाली तरच नवल. हा विमानतळही प्रचंड मोठा असून तेथे आतल्याआत फिरण्यासाठी हायटेक लाईट रेल कनेक्शन आहे. नुकतीच बांधलेली योगा रूम आराम देण्यास तप्तर आहे. तसेच येथून हॉटेल हिल्टनला भेट देऊन तेथील सौना, जिम, स्टीम रूमचा उपभोगही घेता येतो.[nextpage title=”10)बिजिंग इंटरनॅशनल एअरपोर्ट”]

10-Beijing-International-Ai
जगातल्या महाप्रचंड इमारतींपैकी एक अशी याची गणना केली जाते. येथील टर्मिनल तीन जणू शायनिंग स्टारच. दोन मैल लांबीचे हे टर्मिनल चीनच्या महत्त्वाच्या सिंबॉलचे म्हणजे ड्रॅगनचे दर्शन घडविणारे. फोस्टर पार्टनर्स फर्मने हे डिझाईन केले आहे. छत जाळीसारखे असून तेथून सूर्यप्रकाश जणू निथळत असते. पारंपारिक चिनी शुभरंग असलेले पिवळा व लाल रंगाचा कल्पक वापर जमिनींवरील दिव्यांसाठी केला गेला आहे. या विमानतळावर तब्बल 28 हजार चौरस मीटरची भव्य रूफ गार्डन असून विमाने उतरत असताना तिचे दर्शन घडते.

Leave a Comment