फोक्सवॅगनच्या पेट्रोल कारमध्येही घोटाळा

volkswagen
प्रँकफर्ट : डिझेल कारच्या उत्सर्जन चाचणी मानकाच्या घोटाळ्यामध्ये अडकलेली जर्मनी ऑटो कंपनी फोक्सवॅगनच्या पेट्रोल कारमध्येही उत्सर्जन चाचणीमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने त्यांच्या कारची अंतर्गत चौकशी करण्यासाठी आठ लाख कारची
तपासणी केली असून, यामध्ये उत्सर्जन मानके पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या अगोदर फोक्सवॅगन समूहाच्या डिझेल कारमध्ये उत्सर्जन मानके पूर्ण न करण्याबाबतचा मोठा घोटाळा उघडकीस आला होता. आता हा घोटाळा समोर आल्याने फोक्सवॅगन समूहाच्या समस्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या नवीन घोटाळ्यामुळे कंपनीला २०० कोटी युरोंचा तोटा होणार आहे. सप्टेंबरमध्ये उत्सर्जन मानकाकडे दुर्लक्ष करण्याचा घोटाळा समोर आल्यानंतर फोक्सवॅगनने जगभरातून गाड्या पुन्हा रिकॉल केल्या होत्या. कंपनीने यानंतर अंतर्गत चौकशी समिती नेमली होती. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पेटड्ढोल गाड्यामधील या नवीन घोटाळ्यामुळे कंपनीला २०० कोटी युरोंचा मोठा फटका बसणार आहे. कंपनीने ज्या कारची तपासणी केली आहे, यामध्ये स्कोडा, ऑडी आणि सीएट या मोठ्या ब्रँडचाही समावेश आहे.

Leave a Comment