फेसबुकने गोळा केला २८५०० कोटीचा महसूल

face
फेसबुक या जगातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल साईटने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत तब्बल ४.५ अब्ज डॉलर्स म्हणजे २८५०० कोटी रूपयांचा महसूल जमा केला असून गतवर्षीच्या तुलनेत तो ४१ टक्कयांनी अधिक आहे. अर्थात यंदाच्या तिमाहीत ४.३ अब्ज डॉसर्ल महसूल गोळा होईल असा अंदाज कंपनीला होता. तो मागे टाकत नवा विक्रम फेसबुकने नोंदविला आहे. परिणामी फेसबुकचा शेअरही वधारला आहे.

फेसबुक चा निव्वळ नफा ५६०० कोटींवर गेला आहे. कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार दर महिन्याला फेसबुकचे १५५ कोटी अॅक्टीव्ह युजर्स आहे तर दररोज फेसबुक अॅक्सेस करणार्‍यांची संख्या १ अब्जावर आहे. प्रत्येक युजरकडून फेसबुकला सरासरी १८० रु. कमाई होत आहे. वॉटसअॅपचे युजर ९० कोटींवर आहेत तर मेसेंजरचे युजर आहेत ७० कोटी. इंस्टाग्राम ४० कोटी युजर वापरत आहेत. फेसबुकमध्ये सध्या १२ हजार कर्मचारी काम करत आहेत.

Leave a Comment