टाटाच्या नवीन हचबॅक काईटची झलक दिसली

tata
टाटाने त्यांच्या नव्या हचबॅक काईट ची एक छोटी व्हिडीओ क्लिप जारी केली आहे. टाटाने त्यांच्या कॉम्पॅक्ट सेदान झेट व बोल्ट नंतर एंट्री लेव्हल हचबॅकवर फोकस केला असल्याचेही सांगितले जात आहे. काईट कोडनेमची ही नवी गाडी पूर्वीच्या इंडिका व्हीएक्स टूच्या जागी आणली जात असून नवीन पिढीची कार असे तिचे वर्णन केले जात आहे.

या कारला क्रोम स्ट्रीपसह स्मायली ग्रील दिले गेले आहे आणि डायमंड शेप टेललाईट आहेत. ही कार जादा मायलेज देणारी असेल असे सांगितले जात असून ती २०१६ च्या ऑटो एक्स्पो मध्ये लाँच केली जाणार आहे. तिची एक्स शोरूम किमत ३.५ ते ३.७ लाखापर्यंत असेल असेही समजते. या कारला मारूती सुझुकीच्या वॅगन आर व ह्युंदाईच्या आयटेन बरोबर स्पर्धा करावी लागणार आहे.

Leave a Comment