वजनदार वधूसाठी जगातला सर्वात मोठा गाऊन

susane
अमेरिकेतील सूझन इमन या ३२ वर्षीय वधूने एकच वेळी दोन रेकॉर्ड नोंदविली आहेत. सूझनचे वजन ७३० किलो आहे आणि तिच्यासाठी शिवला गेलेला वेडिंग गाऊन जगातील आजपर्यंतचा सर्वात मोठा वेडिंग गाऊन आहे. म्हणजे सूझन सर्वाधिक वजनदार व सर्वात मोठा गाऊन घालणारी वधू बनली आहे. शिवाय ती सुपरसाईज मॉडेलही आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सुझन सिंगल मदर असून तिला दोन मुले आहेत. आपले लग्न होत असल्याने ती भयंकर खूष आहे. मात्र तिच्यासाठी वेडिंग गाऊन बनविणार्‍यांना अक्षरशः घाम फुटला आहे. सूझनला एक आठवड्यात जितका आहार लागतो, तेवढयात एक चार माणसांचे कुटुंब कित्येक महिने जेवू शकते. आठवड्यातून एकदा सूझन ६ मोठ्या ट्राॅली भरून खाण्याचे सामान खरेदी करते.

सूझन सांगते प्रथम तिला इतक्या वजनाची आणि बेढव शरीराची प्रचंड लाज वाटायची मात्र आता तिला आपल्या शरीराबद्दल अतोनात प्रेम वाटते. सुझन नुसते खात नाही ती भरपूर व्यायामही करते. पुरूषांना तिच्याबद्दल खास आकर्षण आहे असेही ती सांगते. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे सुझनला कोणताही आजार नाही अथवा इतक्या प्रचंड वजनाचा कांही त्रासही नाही.

Leave a Comment