५ नोव्हेंबरला येथे दिवाळी साजरी होणार

diwali
आपली संस्कृती आणि चित्रविचित्र रितीरिवाजांसाठी प्रख्यात छत्तीसगड राज्यातील धमतरी जिल्ह्यातील सेमरा गांवात दिवाळी देशाच्या दिवाळी उत्सवाच्या एक आठवडा पूर्वी म्हणजे ५ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. दिवाळी, होळी, पोळा आणि हरेली हे उत्सव येथे नेहमीच आलेल्या तारखेपूर्वी एक आठवडा साजरे केले जातात कारण ही त्यांच्या ग्रामदैवताची इच्छा आहे.दसरा मात्र येथे नियमित तिथीला साजरा केला जातो.

यासंदर्भातली हकीकत अशी, फार फार वर्षांपूवी येथे सिरदार नावाचा एक माणूस वास्तव्यास आला. तो आल्यापासून गावाच्या अडचणी दूर होऊ लागल्या. त्यामुळे त्याच्यात कांही दैवी शक्ती असल्याचे ग्रामस्थ मानू लागले इतकेच नव्हे तर तो मरण पावल्यानंतर त्याचे मंदिर येथे बांधले गेले आणि त्याला ग्रामदैवताचा दर्जा दिला गेला. नंतर तो एका ग्रामस्थाच्या स्वप्नात आला आणि त्याने दिवाळी, होळी, पोळा आणि हरेली हे चार मुख्य सण येणार्‍या तारखेपूर्वीच या गावात एक आठवडा आधीच साजरे केले जावेत अशी इच्छा व्यक्त केली आणि गावातील ज्येष्ठ, तरूण व लहान मुलंापासून सर्वांनी त्याला आनंदाने मान्यता दिली.ही परंपरा शेकडो वर्षे पाळली जात आहे.

Leave a Comment