तपास संस्थांची कंपनी व्यवहारावर नजर

black-money
नवी दिल्ली : काळ्या पैशाची चौकशी करणा-या एसआयटीने मुखवटा कंपन्यांच्या माध्यमातून होत असलेल्या आर्थिक व्यवहारावर बारीक लक्ष ठेवण्याची सूचना केली आहे. कर विभाग, अंमलबजावणी संचालनालयसह विविध तपास संस्थांना ही सूचना देण्यात आली असून, एकाच पत्त्यावरून आर्थिक व्यवहार करणा-या कंपन्यांबाबत सतर्क राहिले पाहिजे, असे म्हटले आहे.

एसआयटीने काळ्या पैशासंबंधी आपला तिसरा अहवाल दिला असून, त्यात या सूचना देण्यात आल्या आहेत. हा अहवाल मुखवटाधारक कंपन्यांशी संबंधित आहे. त्यात २,६७२७ लोकांचा उल्लेख करण्यात आला असून, यातील सर्व मंडळी २०-२० कंपन्यांचे संचालक असून, हे कंपनी कायदा २०१३ चे उल्लंघन आहे. ३४५ कंपन्यांचे पत्ते असे आहेत, ज्यात प्रत्येक पत्त्यावर २०-२० कंपन्यांची नावे आहेत, तर तब्बल १३ हजार ५८१ कंपन्या अशा आहेत, त्यात १९-१९ कंपन्यांचे पत्ते एकाच ठिकाणचे आहेत. हा प्रकार म्हणजे १९५६ च्या कंपनी कायद्यातील २७५ व्या कलमाचे उल्लंघन असून, तब्बल ७७ हजार ६९६ कंपन्यांच्या संचालकांचा यात समावेश आहे. त्यामुळे अशा कंपन्यांच्या व्यवहारावर नजर ठेवण्याचा आदेश एसआयटीने दिला आहे.

Leave a Comment