चिनी रोबोने नोंदविला चालण्याचा विक्रम

robot
चिनी रोबो ने सतत ५४ तास मार्गक्रमणा करून १३४ किलोमीटर जाण्याचा नवा विक्रम नोंदविला आहे. चार पायांचे रोबो शिंजे १ ने हा विक्रम नोंदविताना अमेरिकन रोबो रेंजरचा ३० तासात ६५ किमी अंतर तोडण्याचा विक्रम मागे टाकला. या रोबोचा उपयोग धोकादायक मिशन्स हाताळण्यासाठी करता येऊ शकतो असे संशोधकांचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम चीनमधील चाँन्गक्विग विद्यापीठातील रिसर्च टीमने हा रोबो बनविला आहे. या टीमचे प्रमुख ली किंगडू म्हणाले, २४ आक्टोबर ते २७ आक्टोबर या काळात इनडोअर ट्रॅकवर ३,४०.००० पावले या रोबोने टाकली. त्यानंतर तो रिचार्ज करावा लागला. हे संशोधक करण्यामागे केवळ रोबोच्या गतीचे अंतर वाढविणे हा हेतू नव्हता तर त्याच्या इलेक्ट्रीकल क्षमतेची निरीक्षणे नोंदविणे, रोबोबद्दलची विश्वासार्हता वाढविणे, आणि धोकादायक रिमोट कंट्रोल्ड मिशन्स हाताळण्यासाठी रोबोला सक्षम बनविणे हा मुख्य हेतू होता.

Leave a Comment