कँडी क्रशची तब्बल ५९० कोटींना विक्री

candy-crush
न्यूयॉर्क : फेसबुकवरील रिक्वेस्टमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला आणि अनेकांना अक्षरशः नादाला लावणाऱ्या कँडी क्रश गेमची विक्री करण्यात आली असून अमेरिकेतील सर्वात मोठे गेम प्रोड्यूसर असलेले किंग डिजीटल एन्टरटेनमेंट खरेदी करत असल्याची घोषणा अॅक्टिव्हिजन ब्लिझर्डने केली आहे.

मोबाईल, पीसी प्लॅटफॉर्मवर ५९० कोटींच्या विक्रीमुळे त्यांना वैश्विक पातळीवर अग्रस्थान मिळाले असून अॅक्टिव्हिजन ब्लिझर्ड प्रत्येक समभागासाठी १८ डॉलर देणार असून यामुळे कंपनीच्या महसूल आणि उत्पन्नात ३० टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. आतापर्यंत २०० हून अधिक गेम्स किंग डिजीटल एन्टरटेनमेंट कंपनीने तयार केले असून कँडी क्रशला मिळालेल्या लोकप्रियता आणि महसूलाने सर्व गेम्सना मागे टाकले आहे.

Leave a Comment