दक्षिण अंटार्क्टिकावरील हिमसाठ्यामध्ये मोठी वाढ

south
वॉशिंग्टन – अंटार्क्टिका येथील हिमसाठे कमी होत असल्याबाबत अभ्यासअहवाल हवामान बदलासंदर्भातील जागतिक पातळीवरील संस्था असलेल्या आयपीसीसीसहित इतर संस्थांनी प्रसिद्ध केले असतानाच दक्षिण अंटार्क्टिकावरील हिमसाठ्यामध्ये मोठी वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याचे नासाने म्हटले आहे.

नासाने एका अहवालातून अंटार्क्टिका येथील हवामानाशी संबंधित असलेल्या सुमारे दहा हजार वर्षांच्या जुन्या प्रक्रियेंतर्गत येथील हिमसाठ्यांमध्ये वाढ होत असल्याचा दावा केला आहे. नासाच्या या नवीन अहवालामुळे या अभ्यासास आव्हान मिळाले आहे.

उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीच्या पृथ:करणाच्या आधारे अंटार्क्टिका येथील हिमसाठ्यांत १९९२ ते २००१ या काळात प्रतिवर्षी ११२ अब्ज टन इतकी वाढ झाल्याचे नासाने म्हटले आहे. याचबरोबर, २००३ ते २००८ या काळात अंटार्क्टिका येथे प्रतिवर्षी ८२ अब्ज टन हिमसाठा आढळून आलेला आहे. या प्रक्रियेमुळे पूर्व अंटार्क्टिका आणि पश्‍चिम अंटार्क्टिका भागामधील अंतर्गत भागावरील हिमपातळीमध्ये दरवर्षी सरासरी ०.७ इंचांनी वाढ होत असल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.

अंटार्क्टिकावरील बर्फ वितळल्यामुळे सागरी पातळीमध्ये वाढ होत नसून पाण्याची पातळी वाढण्यामागे अन्य काही कारणे असण्याची शक्यता नासाशी संबंधित असलेले शास्त्रज्ञ जे. झ्वाली यांनी या अभ्यास अहवालातून प्रतिपादित केली आहे.

Leave a Comment