हिरो समूहाचे संस्थापक ब्रीजमोहन यांचे निधन

brijmohan-lal
नवी दिल्ली – रविवारी संध्याकाळी हिरो समूहाचे संस्थापक ब्रीजमोहन लाल मुंजाल यांचे दक्षिण दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यामागे तीन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांच्या पार्थिवावर आज नवी दिल्लीत अंत्यसंस्कार होणार आहे.

१९५६ मध्ये हिरो समूहाची स्थापना करण्यात आली होती. त्याआधीच चार भावांनी १९४० मध्ये या क्षेत्रात प्रवेश केला होता. तेव्हा मोठ्या प्रमाणात सायकल तयार करण्याचे काम या समूहाने केले. पाकिस्तानातील कामालिया येथे मुंजाल यांचा १९२३ मध्ये जन्म झाला. १९८६ मध्ये याच समूहाने हिरो सायकल दिली. तिलाही ग्राहकांनी मोठी पसंती दिली.

जपानच्या होंडासोबत मुंजाल यांनी भागिदारी करत १९८४ मध्ये हिरो होंडा या मोटरसायकल तयार करणाऱ्या कंपनीची स्थापना केली. मोटरसायकल निर्मितीमध्ये ही जगातील सर्वात मोठी कंपनी होती. २०११ मध्ये मात्र ही भागिदारी संपुष्टात आली. ब्रीजमोहन यांना २००५ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

Leave a Comment