न्यूझिलंडच्या भारतीयांमध्ये संतापाचे वातावरण

new-zeland
वेलिंग्टन : न्यूझीलंडचे सर्वात मोठे ऑनलाईन मार्केटप्लेस ‘ट्रेडमी’ वर दिलेल्या एका जाहिरातीमुळे भारतीयांमध्ये संतापाचे वातावरण असून या पोर्टलवर फ्लॅटमेट हवा, अशी जाहिरात देण्यात आली होती. पण त्यापुढे लिहिले होते की, ‘फ्लॅटमेट हवाय, भारतीय किंवा आशियाई नको’ यामुळे न्यूझीलंडमधील भारतीय संताप व्यक्त करत आहे. एक

आठवड्यापूर्वी ही जाहिरात क्राईस्टचर्चमध्ये राहणा-या अ‍ॅलिस्टर नावाच्या व्यक्तीने पोस्ट केली होती, जी हजारो लोकांनी पाहिली. पण वाद झाल्यानंतर जाहिरात हटवण्यात आली. ‘मी वर्णभेदी नाही, पण दररोज वरण/कढी बनवणा-या आणि व्यवस्थित इंग्लिश न बोलणा-यांसोबत मला राहायचे नाही,’ असे स्पष्टीकरण अ‍ॅलिस्टरने दिले. माझे प्रामाणिक उत्तर आहे की, ‘भारत आणि आशियातील बरेच लोक चांगले व्यवस्थित इंग्लिश बोलत नाहीत आणि यापूर्वीही मला संवादासाठी अडचण येत असे.मी अनेक वेळा त्यांना सांगितले की तुम्ही चुकीचे करत आहात, पण त्यांना ते समजत नाही.

Leave a Comment