येत्या दशकात एकट्या महाराष्ट्रात १३५,००० वेल्डरची गरज

welder
कुशल जोडारी (वेल्डर) आणि वायु कापकामकारागीर (गॅस कटर) यांची मोठ्या प्रमाणावर कमतरता निर्माण झाली आहे. सर्व स्तरावरील वेल्डर, नळ आणि पट्टी वेल्डर, पर्यवेक्षक आणि जोडकामअभियंते यांची संख्या अत्यंत कमी आहे. याची झळ वाहन उद्योग, बांधकामउद्योग, संरक्षण क्षेत्र, आणि ऊर्जा निर्मिती उद्योग यांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. कुशल वेल्डरच्या कमतरतेने तर वाहन उद्योग हैराण झाला. २०२२ पर्यंत देशात सुमारे ४४ लाख, तर एकट्या महाराष्ट्रात १ लाख ३५ हजार वेल्डरची गरज आहे. सध्या अनेक प्रकल्प कंत्राटदारांनी जोडकामआणि कापकामकरणारे कारागीर चीन, रशिया, आणि पूर्व युरोपातील देशातून आयात केले आहेत.

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ वेल्डिंगने (आयआयडब्लु) सादर केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कौशल्य विकास यंत्रणेला (एनएसडीसी) हा अहवाल सादर केला आहे. कौशल्य विकास यंत्रेणेने कुशल वेल्डर घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा मागणीचे निवेदन पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रुडी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले आहे.

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ वेल्डिंगचे अध्यक्ष श्री. आर. श्रीनिवासन म्हणाले, ‘‘कुशल (वेल्डर) आणि वायु कापकामकारागीर (गॅस कटर) यांची तीव्र कमतरता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात ४९३ शिक्षण संस्था पदविका अभ्यासक्रमशिकवतात. ३६० हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. आणि ७९६ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आहेत, ज्या कुशलता प्रशिक्षण देतात. तरीही राज्य सरकारने स्वतः असा अंदाज प्रसिद्ध केला आहे की, २०२२ साली संपणार्‍या दशकात १ लाख ३५ कुशल मनुष्य बळाची कमतरता महाराष्ट्राला भेडसावणार आहे.’’ देशाच्या वाहन उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा ३३ टक्के आहे. येथे स्थानिक मूळ उपकरण उत्पादक (ओईएम) सर्वाधिक संख्येने आहेत. हे राज्य अवजड आणि व्यापारी वाहने उत्पादनात देशात अग्रेसर आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर येथे केलेल्या एका अभ्यासानुसार केवळ वाहन आणि वाहन सुटे भागक्षेत्रात मिळून येत्या दशकात तब्बल १.३५ लाख वेल्डर कमी पडणार आहेत. नवीन वेल्डरला नोकरीवर घेणे आवश्यक आहे. अकुशल वेल्डरला लवकरात लवकर प्रशिक्षण देणे आणि प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे, असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

महाराष्ट्रात अनेक मोठ्या संस्थांचे निर्मिती कारखाने आहेत. त्यात टाटा मोटर्स, बजाज ऑटो, फोर्स मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा, मर्सेडीस-बेंझ, जनरल मोटर्स, फोक्सवागन, हयुंदाई यांचा समावेश आहेत. यातील अनेक संस्थांचे संशोधन आणि विकास केंद्र सुद्धा राज्यात आहे. महाराष्ट्रातील वाहन निर्मिती उद्योगापुढे प्रमाणपत्र धारक कुशल जोडारी कमी पडण्याचे संकट घोंगावते आहे.

वृत्तपत्रातील जाहिरातीत ‘पाहिजे आहेत’ असे कायमवाचायला मिळते. जोडकामकरू शकणारे साधारण देखभाल कामगार हवे आहेत. उद्योगांना त्यांच्या भांडवली गुंतवणुकीचा योग्य उपयोग करून घ्यायचा आहे. जुन्या आणि झिजलेल्या यंत्रात प्राण फुंकणार्‍या जोडारींवर त्यांचा विश्वास आहे. असे कौशल्य सध्या दुर्मिळ झाले असून त्याला प्रचंड मागणी आहे. जोडारींना उत्तमपगार मिळतो. वार्षिक उत्पन्न ३ लाख ते ४० लाख रुपयापर्यंत जाऊ शकते. जर आपण जोडकामउद्योगात स्वतःला झोकून दिलेत तर आपण कधीच बेरोजगार होणार नाही, असे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वेल्डिंगचे उपाध्यक्ष श्री. ए. ए. देशपांडे यांनी सांगितले.

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ वेल्डिंगने महाराष्ट्र शासनाशी भागीदारी करून भारतीय तरुणांना प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यामुळे प्रमाणपत्रधारक जोडारींची कमतरता भरून काढता येईल. हे कौशल्य प्रशिक्षण २१ व्या शतकातील उत्पादन क्षेत्रापुढील आव्हानांशी सुसंगत असले पाहिजे, असेही ते म्हणाले.

कुशल वेल्डर तयार करण्यासाठी आयआयडब्लुने एक राष्ट्रीय जोडकामपरिसंवाद आणि वेल्ड इंडिया प्रदर्शन नवी मुंबई येथे ९ ते १२ डिसेंबर २०१५ दरम्यान आयोजित करण्याचे ठरवले आहे. या कार्यक्रमात आधुनिक उपकरणे पहायला मिळतील. जागतिक पातळीवरील जोडकामातील आधुनिक तंत्रज्ञानाचे सर्वोत्तमप्रात्यक्षिक बघता येईल. भारतातील जोडकामक्षेत्रातले अग्रणी एकत्र बसून शासकीय अधिकारी, अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्रशासक, भारतीय तंत्रज्ञान संस्था, तसेच राज्य शासन संचालित आयटीआयचे अधिकारी यांच्याशी अभ्यासक्रमअद्ययावत करण्याविषयी, सुसंगत विषय शिकवण्यासाठी, आणणी उद्योगांद्वारे प्रशिक्षणातून सहभागाविषयी चर्चा करतील. विद्यार्थ्यांनी आयआयडब्लुच्या मुंबई कार्यालयाशी (iiwiiwindia.comIIWMumbaiBranch ) संपर्क साधावा. त्यांचे फेसबूक पेज सुद्धा आहे ज्याद्वारे परिसंवादात मोफत सहभाग घेता येईल आणि जोडकामात आपले भविष्य घडवण्याची शक्यता तपासून पाहता येईल, असे आर. श्रीनिवासन म्हणाले.

हा ९ ते १२ डिसेंबर २०१५ या चार दिवसात नवी मुंबईत होणारा आयआयडब्लुचा कार्यक्रमम्हणजे संशोधक, शिक्षणतज्ञ, शास्त्रज्ञ, धातुशास्त्रज्ञ, अभियंते, जोडकामात लागणार्‌या साहित्य आणि उपकरणांचे निर्माते व जोडकामआणि कापकामतंत्रज्ञ यांना भेटण्याची मोठी पर्वणी आहे. ३५ हून अधिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शक आपली अत्याधुनिक जोडकामतंत्रज्ञान आणि जोडकामातले यंत्रमानव तसेच प्रक्रिया यांत्रिकीकरणातली प्रगती दाखवतील.