भारतात लाँच होणार मोटो एक्स फोर्स

moto
मुंबई : नोव्हेंबरमध्ये भारतात लाँच होण्यास मोटोरोलाचा ‘मोटो एक्स फोर्स’ सज्ज झाला असून शॅटरप्रूफ डिस्प्ले पॅनल म्हणजे चीरही न पडणारी स्क्रीन हे या फोनचे वैशिष्ट्य आहे.

कंपनीने मोटोरोलाच्या शॅटरशील्ड तंत्रज्ञानाचा वापर करुन बनवलेल्या स्क्रीनसाठी ४ वर्षांची वॉरंटीही दिली आहे. या फोनला दोन टचस्क्रीन लेअर दिल्यामुळे एखाद्या स्क्रीनला तडा गेला तरी फोन वापरताना अडचण येणार नाही.

फक्त ब्लॅक बॅलिस्टीक नायलॉन फिनीश (रंगात) मोटो एक्स फोर्स उपलब्ध असून त्यावर वॉटर रेपेलंट नॅनो कोटिंग दिले असले तरी हा फोन वॉटर रेजिस्टंट नाही. मोटो एक्स फोर्सच्या ३२जीबी वेरिएंटची यूकेमध्ये किंमत ५३४ पाऊँड म्हणजे सुमारे ५४ हजार रुपये असून अद्याप मोटो एक्स फोर्सच्या भारतातील किंमती गुलदस्त्यातच आहेत.

Leave a Comment