फेसबुक आणि बीएसएनएल देणार १०० खेड्यात वायफाय

facebook
नवी दिल्ली: फेसबुक आणि भारत संचार निगम देशाच्या ग्रामीण भागापर्यंत इंटरनेट सुविधा पोहोचविण्यासाठी १०० गावांमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

यासाठी फेसबुक दरवर्षी ५ कोटी रुपये खर्च करून बीएसएनएलकडून बँडविड्थ घेणार आहे. त्याचप्रमाणे ‘क्वाड झेन’ आणि ‘ट्रायमॅक्स’ या कंपन्यांकडून फायबर आणि इतर साधनसामुग्री घेणार आहे.

या योजनेअंतर्गत सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर दक्षिण आणि पश्चिम भारतातील २५ खेडेगावांची निवड करण्यात येणार आहे. या गावांमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही योजना ३ वर्षांसाठी असून या कालावधीत १०० गावांमध्ये ही सुविधा देण्यात येणार आहे. मात्र त्यानंतरही या योजनेचे मूल्यमापन करून त्याचे विस्तारीकरण करण्यात येईल; असा विश्वास बीएसएनएलच्या वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केला.

Leave a Comment