आयडिया आणणार स्वत:च फोरजी स्मार्टफोन

idea
दिल्ली- आयडिया सेल्युलर ने भारतात फोरजी सेवा देण्यासाठी स्वत:च्या ब्रँडचा फोर जी स्मार्टफोन आणण्याची तयारी केली असून त्यासाठी त्यांनी चीनच्या टीएलसी कम्युनिकेशन बरोबर चर्चा सुरू केली आहे. ही भारतीय टेलिकॉम कंपनी भारतात लवकरच फोर जी सेवा देत आहे व त्यासाठी त्यांना भारती, व्होडाफोन व रिलायन्स जिओ या कंपन्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करणे हे कंपनीचे मुख्य ध्येय आहे व त्यासाठीच फोरजी सेवेसोबत स्वत:च फोरजी स्मार्टफोन ही योजना आखली गेली आहे.

2016 च्या पहिल्या सहामाहीत भारतातील 750 शहरात फोरजी सेवा सुरू करणार आहे. चिनी टीसीएल कम्युनिकेशन सोबत कंपनी अल्काटेल वनटच ब्रँड फोनच आणेल असेही समजते कारण थ्रीजी साठी असा फोन बाजारात आणला गेला आहे.

Leave a Comment