[nextpage title=”सोन्याच्या बाजारावर कब्जा असलेले टॉप १० ज्वेलर्स”]
दसरा दिवाळीचा सण आता तोंडावर आला असताना घरोघरी सोने चांदीची कमी अधिक प्रमाणात खरेदी करण्याचे मनसुबे रचले जात असतील. भारत हा सोनवेड्यांचा देश म्हणून जगात प्रसिद्धीच्या शिखरावर आहेच. इंडियन गोल्ड मार्केटवर कब्जा असलेल्या सराफांबाबतचा एक अहवाल ग्लोबल वेल्थ इंटेलिजन्सच्या वेल्थ एकस ने नुकताच जारी केला आहे. हे सराफ केवळ सराफी व्यवसाय करत नाहीत तर त्यांनी या व्यवसायाला कार्पोरेट कंपनीचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. कोण आहेत हे भारतातले टॉप दहा ज्वेलर्स ते पाहू.
सोन्याच्या बाजारावर कब्जा असलेले टॉप १० ज्वेलर्स
१) कल्याण ज्वेलर्स
टी.एस. कल्याणरमण हे या कंपनीचे सर्वेसर्वा. त्यांची संपत्ती आहे १.३० अब्ज डॉलर्स. विशेष म्हणजे आपले पहिले स्टो्अर् केरळातील त्रिचूर येथे त्यांनी १९९३ साली सुरू केले आणि आता जगात ९० हून अधिक त्यांच्या पेढ्या आहेत. बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणारी बच्चन फॅमिली त्यांची ब्रँड अँबेसिडर आहे. [nextpage title=”२) फायर स्टार डायमंड”]
फायर स्टार डायमंड या पेढीचे मालक नीरव मोदी यांनी १९९९ मध्ये केवळ १५ कामगारांसह त्यांचा व्यवसाय सुरू केला होता. सुट्या हिर्यांचे पुरवठादार असलेल्या मोदींच्या सूरत येथील व्यवसायात आज १२०० हून जास्त कामगार आहेत त्यांची मालमत्ता आहे १.१० अब्ज डॉलर्स. [nextpage title=”३)मलाबार गोल्ड अॅन्ड डायमंड”]
मलाबार गोल्ड अॅन्ड डायमंडचे मालक एम.पी.मोहमद हे या यादीतील तिसरे प्रस्थ. केरळातच त्यांनी १९९३ साली त्यांच्या व्यवसायाची सुरवात आणि आज आठ देशांत त्यांची १३४ आउटलेट आहेत. त्यांची वर्षाची उलाढाल ३५० कोटींची असून मालमत्ता आहे १ अब्ज डॉलर्स. जगातील पाच बड्या ज्वेलरी कंपन्यांत त्यांच्या कंपनीचा समावेश आहे. करिना कपूरने त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती केल्या आहेत. [nextpage title=”४)भीमा ज्वेलर्स”]
बी गोविंदन हे भीमा ज्वेलर्स या ब्रँडचे मालक आहेत. केरळमध्ये १९२५ सालापासून त्यांचे दुकान असून केरळबरोबर तमीळनाडू, कर्नाटकातही त्यांच्या शाखा आहेत. त्यांची मालमत्ता आहे ६२ कोटी डॉलर्स. [nextpage title=”५)किरण जेम्स”]
किरण जेम्स ही कंपनी तीन जणांनी मिळून स्थापन केली असून त्यातील एक को फौंडर वल्लभभाई पटेल ५९ कोटी डॉलर्सचे मालक आहेत. ही कंपनी जगातील सर्वात मोठ्या हिरे कंपन्यांपैकी एक आहे. [nextpage title=”६)लक्ष्मी डायमंड”]
लक्ष्मी डायमंड वसंत गजेरा यांच्या मालकीची ही कंपनी १९७२ पासून सूरत येथे आहे. आज येथे ५ हजार कामगार काम करतात. त्यांच मालमत्ता आहे ५८ कोटी डॉलर्स. [nextpage title=”७)धर्मानंदम डायमंडस”]
मोदींचा बहचर्चित सूट लिलावात ४.३१ कोटींना खरेदी करून चर्चेत आलेले लालजीभाई पटेल हे धर्मानंदम डायमंडस या कंपनीचे मालक. १९८५ साली स्थापन झालेल्या या कंपनीत आज ३८०० कामगार काम करतात आणि लालजीभाई ४८ कोटी डॉलर्स मालमत्तेचे मालक आहेत. [nextpage title=”८)किरण ज्वेलर्स”]
किरण ज्वेलर्सचे भागीदार बाबूभाई लखानी या यादीत आठव्या स्थानावर असून त्यांची मालमत्ता आहे ४७० दशलक्ष डॉलर्स. [nextpage title=”९)किरण ज्वेलर्स”]
किरण ज्वेलर्सचे आणखी एक सहसंस्थापक मावजीभाई पटेल हे ४१० दशलक्ष डॉलर्सच्या मालमत्तेचे धनी आहेत. [nextpage title=”१०)राजेश एक्स्पोर्टस”]
राजेश एक्स्पोर्टस या फर्मचे मालक राजेश मेहता हे भारतातील दहा टॉप ज्वेलर्सपैकी दहावे ज्वेलर आहेत. त्यांची मालमत्ता आहे ३१० दशलक्ष डॉलर्स. बंगलोर येथे त्यांचा व्यवसाय असून त्याची सुरवात त्यांनी घरातील गॅरेजमध्ये केवळ १२०० रूपयांची गुंतवणूक करून १९८२ साली केली होती. आज त्यांची वर्षाची उलाढाल ३० हजार कोटींची आहे.