नवी दिल्ली : रात्री वापरण्यात आलेल्या डाटातील अर्धा भाग पुन्हा भारती एअरटेलच्या ग्राहकांना मिळणार असून अनलिमिटेड गाणे आणि पाच चित्रपट विंक मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे डाऊनलोड करू शकणार आहेत.
एअरटेलचा धमाका; दर महिन्याला मोफत डाऊनलोड करा अनलिमिटेड गाणे आणि ५ चित्रपट
आपल्या नेटवर्ककडे कंपनीने स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांना आणखी आकर्षित करण्यासाठी ही सुविधा दिली आहे. याबाबत माहिती देताना भारती एअरटेलचे निदेशक (कस्टमर बिझनेस) श्रीनि गोपालन यांनी सांगितले की, प्री पेड ग्राहकांसाठी एअरटेलने ‘डेटा कॅश बॅक ऑफर’ सुरू केली आहे. पण एका आठवड्यानंतर ती ऑफर पोस्टपेड ग्राहकांसाठीही सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एअरटेल ग्राहक योजनेनुसार रात्री १२ ते ६ या काळात जे काही इंटरनेट वापरतात त्यातील ५० टक्के हिस्सा सकाळी त्यांच्या खात्यात जमा केला जाईल.
ही योजना २ जी, ३ जी आणि ४ जी सर्वांसाठी लागू करण्यात आली आहे. स्मार्टफोन डिजीटल इंडियाला पुढे नेणार आहे. चांगला स्मार्टफोन अनुभव आणि सेवा देईल त्याचा त्यांना फायदा होईल.
या सेवेसाठी ग्राहकांना १२१ ला एक एसएमएस पाठवावा लागणार आहे. किंवा ५५५५५ वर मिस्ड कॉल द्यायचा आहे. किंवा माय एअरटेल अॅप लॉग इन करावे लागणार आहे. त्यातील विंग मोबाईल अॅपद्वारे अलिमिटेड गाणे ऐकता येणार आहेत. तसेच पाच सिनेमे पाठविता येणार आहे.
Good company .so evrytime get free offer happy diwali