२४ वर्षानंतर पुन्हा त्याच ठिकाणी विचित्र आकाराची तबकडी

ufo
मेक्सिको – २४ वर्षानंतर पुन्हा त्याच ठिकाणी विचित्र आकाराची तबकडी पाहिल्याचा दावा एकाने केला असून ही तबकडी सन १९९१ पाहिली असल्याचे अमन्डो मार्क्वेज याने सांगितले. आता तीचे फोटो काढले असून ती त्यावेळचीच तबकडी असल्याचे सांगितले.

याबाबत मार्क्वेज म्हणाला की, त्याच्या घरावर १९९१ असली एक विचित्र आकाराचे काहीतरी उडत होते. त्यानंतर ११ सप्टेंबर २०१५ रोजी पुन्हा तीच गोष्ट पाहिली असून तिचे चित्रीकरण केल्याचेही सांगितले. ‘द जर्लन डी माँट्रील’नुसार, ही गोष्ट काय आहे, याबाबत शहर प्रशासनास कोणतीही माहिती नाही. मात्र ही वस्तू पाहिली ते ठिकाण आता ‘यूएफओ हॉटस्पॉट’ म्हणून ओळखले जाऊ लागेल आहे. हे ठिकाण म्हणजे टेपोझ्ट्लॉन असून तेथे मार्वेज राहतो. हे गाव मार्लोस राज्यात पर्वतीय भागात वसले आहे. येथील अनेक जणांनी ती तबकडी परिसरातील पर्वतीय भागात पाहिली असल्याचा दावा केला आहे. अमेंडो मार्क्वेज याने सांगितले की, ५ मे २०१५ रोजी गोल आकाराची तबकडी या भागातील पर्वतीय भागात पाहिली आहे. टेपोझ्ट्लॉन या घटनेमुळे एलियनची भूमी म्हणून प्रसिद्ध झाल्यामुळे येथे पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे भेटी देत आहेत.

Leave a Comment