महिलांमध्ये वाढतो आहे स्तनाचा कर्करोग

cancer
मुंबई : अनेक महिला कामाचा अतिरिक्त ताण व कौटुंबिक जबाबदारी यात अडकून पडल्याने आपले दुखणे अंगावर काढतात. सतत आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याने महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत असून निदान व उपचार वेळेवर न झाल्याने आजार अधिक बळावतो. इतकेच नव्हे तर संबंधित महिलेचा मृत्यू होण्याचीही दाट शक्यता असते; परंतु, या स्तनांच्या कर्करोगाचे लवकर निदान व उपचार केल्याने हा आजार बरा होऊ शकतो. त्यामुळे महिलांनी आजाराकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

हळूहळू वाढत जाणारा कर्करोग हा आजार आहे. यात शरीरातील कोणत्याही बाजूला गाठ आल्यावर व ती गाठ तीन आठवड्यापेक्षा अधिक राहिल्यास संबंधित व्यक्तीने कर्करोगाची तपासणी करणे गरजेचे असते; परंतु अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करत असल्याने आजार वाढतो. महत्त्वाचे म्हणजे, कर्करोगाचे निदान व उपचार झाले तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. या दृष्टीने मेमोग्राफी ही अत्यंत महत्त्वाची तपासणी असते. हिचा मूळ उद्देश कुठलीही लक्षणे किंवा आजार नसताना स्तनाची तपासणी करून लवकरात लवकर कर्करोग शोधून काढणे हा असतो. विशेषत: महिलांना ४० व्या वर्षी मेमोग्राफी करण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. कारण, मेमोग्राफी कर्करोग दिसताना एखादी छोटी गाठ किंवा स्तनांच्या नेहमीच्या रचनेत फरक अशा स्वरूपात दिसतो. काही वेळा कर्करोगाचे निदान खात्रीपूर्वक करता येते, पण ब-याच वेळा दिसणारा दोष हा कर्करोगामुळे आहे का? दुस-या कशामुळे हे फक्त मेमोग्राफीवरून सांगणे शक्य नसते. अशावेळी सोनोग्राफीसारख्या इतर चाचण्यांची मदत घ्यावी लागते. दिसणारी गाठ ही घट्ट आहे का पाण्याची हे सोनोग्राफीत कळते. या कारणास्तव आजारावर उपचार करणे गरजेचे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment