मंगळ मोहिमेसाठी माकडांच्या प्रशिक्षणाला सुरूवात

mars
मॉस्को – २०१७ च्या मंगळ मोहिमेसाठी माकडांना प्रशिक्षण देण्यास रशियन अॅकेडमी ऑफ सायन्सेसने सुरुवात केली असून यात रिमोट किंवा जॉयस्टिकचा वापर, कोडी सोडविणे यांचा समावेश आहे.

या प्रयोगासाठी विशेष फार्ममध्ये जन्म झालेल्या माकडांचीच निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी त्यातील जी सर्वात हुशार माकडे आहेत त्यांची निवड करण्यात आली आहे. चार माकडे या प्रयोगात सहभागी असून त्यांची गोष्टी समजून घेण्याची क्षमता आणि सर्वात जलद शिकू शकण्याच्या क्षमतेच्या आधारावर त्यांची निवड करण्यात आली आहे. कर्सरने ते योग्य लक्ष्य हिट करू शकतात का हे तपासण्यात येत आहे. या चाचण्यांमध्ये ते उत्तीर्ण झाले तर त्यांची गणिती अभियोग्यता तपासण्यात येणार आहे. तसेच हे सर्व झाल्यानंतर माकडे आपला दिनक्रम ठरवू शकण्यासाठी योग्य बनली की नाही हे तपासण्यात येणार आहे. १९४८ ला अल्बर्ट १ नावाचे माकड अंतराळात पाठविण्यात आले होते परंतु ते गुदमरुन मेले होते. त्यानंतर तब्बल चार माकडे अंतराळात गेली होती. त्यापैकी फक्त एकच माकड जीवंत राहिले होते.

Leave a Comment