फेसबुकचे नवे फीचर लॉन्च

facebook
मुंबई : नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवे फीचर्स घेऊन फेसबुक येत असते. फेसबुकने आता ‘मेसेज रिक्वेस्ट’ फीचरची सुरुवात केली असून फेसबुक याद्वारे फ्रेण्ड लिस्टमध्ये नसलेल्या व्यक्तीलाही मेसेज करता येणार आहे.

अनेकदा एखाद्याला मेसेज करायचा असतो. मात्र ती व्यक्ती आपल्या फ्रेण्डलिस्टमध्ये नसल्याने त्याला मेसेज करता येत नाही. याबाबत अनेक फेसबुक युजर्सनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, फेसबुकने नवे फीचर लॉन्च करत युजर्सच्या समस्या सोडवली आहे. तुमच्या लिस्टमध्ये तुम्ही नसलेल्या व्यक्तीलाही मेसेज करु शकता. पण, हा मेसेज ज्या व्यक्तीला तुम्ही पाठवला असाल, त्याच्या ‘Other’ नावाच्या फोल्डरमध्ये जाईल. अर्थात तो मेसेज समोरच्याला पाहता येणार नसल्यामुळे हे फीचर्स युजर्सच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मानले जाते आहे.

तुम्ही जेव्हा तुमच्या मोबाईलवर फेसबुक वापरत असाल, तेव्हा हे मेसेज तुम्हाला मेसेंजरमध्ये वरच्या बाजूला ‘मेसेज रिक्वेस्ट’मध्ये दिसेल आणि जेव्हा तुम्ही वेबवर फेसबुक ओपन कराल, त्यावेळी फेसबुक मेसेंजरमध्ये ‘Other’ नावाच्या फोल्डरमध्येच दिसेल.

Leave a Comment