काठमांडू – भारतातील इंडियन ऑईल कार्पोरेशन (आयओसी) आणि नेपाळ ऑईल कार्पोरेशन (एनओसी)यांच्यातील करार संपुष्टात आले असून यापुढे भारतातील आयओसी कंपनीशी एनएसओने करार कायम न ठेवता चीनशी केला आहे.
नेपाळने केली चीनशी हातमिळवणी
भारताशी नेपाळच्या या तेल कंपनीने असलेला ४० वर्षाचा करार संपल्यानंतर चीनच्या पेट्रो चायना या कंपनीशी करार केला आहे. या करार पत्रावर दोन्ही देशांकडून स्वक्षऱ्याही करण्यात आल्या. करारावर स्वाक्षरी होताच चीनमधील नेपाळचे राजदून महेश मास्के यांनी माध्यमांशी चर्चा केली, ते म्हणाले की चीनमधून नेपाळमध्ये इंधन येणाचा मार्ग मोकळा झाला आहे.