व्यापारासाठी सुविधा देण्याच्या यादीत भारत १३०व्या स्थानी

world-bank
वॉशिंग्टन – भारतातील व्यापारासाठी सुविधा देण्यात येणाऱ्या स्थितीत सुधारणा झाली असून याबाबतीत भारताने १३० वे स्थान गाठले आहे. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ अंकांनी सुधारणा झाली आहे. जागतिक बँकेने जारी केलेल्या अहवालात ही बाब नोंदवण्यात आली आहे. जागतिक बँकेने व्यापारासाठी चांगल्या सुविधा देणाऱ्या १८९ देशांची यादी जाहीर केली आहे. त्यात भारताला १३० वे स्थान आहे. गेल्यावर्षी भारत १४२ व्या स्थानी होता.

भारतासाठी १२ अंकांची सुधारणा उल्लेखनीय बाब असल्याचे अर्थशास्त्रज्ञ कौशिक बसु यांनी म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी हे चांगले संकेत आहेत, असेही बसु यांनी म्हटले आहे. जागतिक बँकेने ‘डुईंग बिझनेस २०१६’ असा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये सिंगापूरला अव्वलस्थान आहे. यानंतर न्यूझीलंड, डेनमार्क, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, ब्रिटन आणि अमेरिका यांना स्थान मिळाले आहे.

चीन ८४ व्या तर पाकिस्तान १३८ व्या स्थानी आहे. गेल्यावर्षी पाकिस्तानला १२८ वे स्थान होते. तर चीन ९० व्या स्थानी होता.

Leave a Comment