पृथ्वीवरची स्वर्गीय ठिकाणे

[nextpage title=”पृथ्वीवरची स्वर्गीय ठिकाणे”]

collarge

आपली पृथ्वी किती सुंदर आणि अद्भूत आहे याची कल्पना करणे खरेतर अशक्य कोटीतील गोष्ट आहे. सुंदर स्थळांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास केला जातो आणि त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागत असतो. मात्र पृथ्वीवर कांही स्थळे अशीही आहेत, ज्यांची कल्पना आपण करू शकत नाही. नुसते फोटो पाहिले तर ही ठिकाणे परग्रहावरची असावीत अथवा अॅलीसच्या वंडरलँडमधील असावीत असा समज होईल. मात्र ती खरीखुरी आहेत आणि आपल्या धरतीवरचीच आहेत. त्यांची ही ओळख

socotra

१)सोकोट्रा आयलंड
हिंद महासागरातील चार बेटांपैकी एक असलेले हे बेट म्हणजे परग्रहवासींच्या निवासाचे ठिकाण असावे असा सहज समज होऊ शकतो. येथे २५० जातीचे वृक्ष आणि अनेक प्रकारची फुलझाडे आहेत आणि विशेष म्हणजे ती जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही दिसत नाहीत. त्यातील महत्त्वाचे म्हणजे ड्रॅगन ब्लड ट्री आणि जाड खोडांचे गुलाब हे ड्रॅगन ब्लड ट्री डोक्यावर भरगच्च मुकुट घातल्यासारखे दिसतात आणि त्यांची साल खरवडली तर त्यातून रक्तासारखा पदार्थ बाहेर येतो. येथील वाळवंटी गुलाब १० फूट उंच वाढतो आणि जाड खोडाच्या या गुलाबाला बहरही खूप येतो. [nextpage title=”२)रिओ टिटो”]

red-river

हे स्पेनमधले स्थळ म्हणजे नदी आहे. या शब्दाचा अर्थच मुळी रेड रिव्हर असा आहे. आणि ती नावाप्रमाणे खरोखरच लाल आहे. तिला हा रंग पाण्यातील विशिष्ठ प्रकारच्या बॅक्टीरियांमुळे आणि खाणींच्या प्रदूषणामुळे मिळाला आहे. चंद्रासारखा पृष्ठभाग असलेल्या या भागात खाण उद्योग ३००० वर्षांपूर्वीच सुरू झाल्याचे सांगितले जाते. पाण्यातील बॅक्टेरिया कमी प्राणवायू असलेले आहेत. नासानेही या नदीचा अभ्यास केला आहे. मात्र तिच्या लाल रंगाच्या पाण्यामुळे नदीत उतरावे अशी इच्छाच होत नाही. [nextpage title=”३)स्पॉटेड लेक”]

canada

कॅनडातील ६१ एकरांचा परिसर व्यापलेले हे सरोवर जगातील सर्वाधिक क्षार असलेले सरोवर आहे. या पाण्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम, सिल्व्हर, टिटॅनियम असे अनेक क्षार विरघळलेले आहेत व त्यामुळे पाण्यात नीळा, हिरवा, पिवळा असे विविध रंग परावर्तित होतात. सरोवरातील पाणी बाष्पीभवनाने सुकले की या क्षारांचे क्रिस्टल्स बनतात. त्यामुळे अनेक कडा असलेली वर्तुळे तयार होतात व त्या छोट्या खड्यांतून असलेले पाणीही नीळे हिरवे रंग परावर्तित करते. [nextpage title=”४)सॉल्ट फ्लॅटस”]

salt-bolivia

बोलिव्हीया देशातील हे ठिकाण म्हणजे ३० हजार वर्षांपूर्वीचे सरोवर असल्याचा अंदाज आहे. मिनचिन नावाचे हे सरोवर कोरडे पडले आणि हा मीठाचा महासागर तयार झाला. सलार डी युन्नी नावाच्या या सरोवरात आज १० अब्ज टन मीठ आहे आणि ४ हजार चौरस मैलाच्या परिसरात त्याचा विस्तार आहे. येथेही निसर्गाची अद्भूत किमया दिसते आणि ती म्हणजे येथे दिसणारी प्रचंड मृगजळे. या परिसरात आपण पृथ्वीवर नाही असाच भास होत असतो. [nextpage title=”५) स्टोन फॉरेस्ट”]

stone

चीनमधले हे जगातील पहिले आश्चर्य असून मिंग राजशाहीपासून ते प्रसिद्ध आहे. येथे अक्षरशः दगडांचे जंगल आहे. आणि हे खडक गगनाला गवसणी घालतील इतके उंच आहेत. जमिनीतून जणू दगडांचे वृक्षच निर्माण झाले असावेत असे येथील दृष्य आहे. पाण्यामुळे या भागाची जी धूप झाली त्यामुळे हे आश्वर्य जन्माला आल्याचे भूतज्ञ सांगतात.[nextpage title=”६) रिचॅट स्ट्रक्चर”]

rechat

सहारा वाळवंटातील हे ठिकाण आय ऑफ सहारा म्हणजे सहाराचा नेत्र या नावाने परिचित आहे. पूर्वी हे प्रचंड विवर उल्कापातामुळे तयार झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र आता धूप आणि जमिनीचा कांही भाग वर उचलला गेल्यामुळे हे विवर तयार झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. वाळू आणि खडकांनी भरलेले हे विवर ४० किमी रूंदीचे असून ते अंतराळातूनही दिसते. मात्र या विवराचा इतका गोल आकार कसा काय बनला असावा याचे कोडे अद्यापीही उलगडलेले नाही.

Leave a Comment