इंटरनेटवरील अनोळखी व्यक्तीवर ५० टक्के भारतीय मुले ठेवतात विश्वास

Untitled-1
नवी दिल्ली: – अमेरिकन आधारीत इंटेल सुरक्षा सर्वेक्षणानुसार, भारतातील ५० टक्के मुलाना इंटरनेटवरील अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना इंटेल सिक्युरिटीचा आशियान पॅसिफिक कन्सुमेर मार्केटींगच्या अध्यक्षा मेलानिये दूका म्हणाल्या कि, या सर्वेक्षणाचे नाव टीन, ट्विन्स आणि तंत्रज्ञान सर्वेक्षण असे असून यामध्ये पालक आणि त्याचे पाल्य यांचा काही संवाद होतो का याचा खुलासा करण्यात आला आहे. या वर्षी याबाबतीत काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, ७१ टक्के पालक आणि त्यांचे पाल्य यांच्या मधील सर्वात महत्वाचा चर्चेचा विषय म्हणजे सायबर गुन्हे आणि गुन्हेगारांना शोधणे, ६२ टक्के प्रायवेसी सेटिंग, सायबर बुल्ल्लिंग ५७ टक्के, मित्रांमधील लोकप्रियता ५२ टक्के आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे १७ टक्के पालक त्यांच्या पाल्यला अनोळखी व्यक्ती सोबत बोलताना शोधत असतात. त्यामुळे झालेल्या सर्वेक्षणानुसार पालकांना आपले मुल अनोळखी व्यक्तीशी इंटरनेटवर संवाद साधत असल्याची भीती वाटू लागली आहे.

Leave a Comment