जगातला पहिला मॉड्युलर फेअरफोन टू सादर

fairphone
गुगलने त्यांच्या आरा प्रोजेक्टद्वारे ग्राहकाच्या गरजेनुसार त्याला स्वतःला असेंबल करता येईल असा स्मार्टफोन बनविण्याच्या प्रकल्पावर काम सुरू केले असतानाच फेअरफोन कंपनीने जगातला पहिला कस्टमाईज्ड म्हणजे स्वतःच्या गरजेनुसार जुळणी करता येणारा स्मार्टफोन फेअरफोन टू नावाने बाजारात आणला जात असल्याची घोषणा केली आहे. या फोनचे शिपिंग डिसेंबरपासून सुरू होत आहे मात्र सध्या तो फक्त युरोपमध्येच उपलब्ध होणार आहे. फोनची किंमत ५२९.३८ युरो म्हणजे अंदाजे ३८ हजार रूपये आहे.

हा फोन अँड्राईड ५.१ लॅालिपॉप ओएस सह असला तरी त्याला सेल्फीश ऑपरेटिंग सिस्टीमचे कस्टमाईज्ड व्हर्जन प्री इन्स्टॉल करण्यासाठी जोलाशी भागीदारी केली गेली आहे. या फोनसाठी ५ इंची फुल एचडी स्क्रीन, एलसीडी टीएफटी डिस्प्ले, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन, २ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी, ८ एमपीचा प्रायमरी व २ एमपीचा फ्रंट कॅमेरा, ड्युल सिम व टूजी, थ्रीजी, फोरजी नेटवर्क कनेक्टीव्हीटी ऑप्शन्स अशी फिचर्स दिली गेली आहेत.

Leave a Comment