मेड इन इंडिया मारूती चालली जपानला

maruti
दिल्ली – मारूती सुझुकी इंडिया प्रथमच मेड इन इंडिया कार जपानला निर्यात करणार आहे. जपान हे मारूतीच्या पॅरंट कंपनी सुझुकी मोटर कॉर्पचे मूळ ठिकाण आहे. मारूती सुझुकीसाठी भारत हे निर्यात केंद्र बनविण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल असल्याचे कंपनीचे प्रमुख केनिची अयुकावा यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार सुझुकी मोटर्सच्या महसुलापैकी एक तृतीयांश भाग हा मारूतीतून येतो. भारतात विक्री होत असलेल्या दर दोन कारमध्ये एक मारूती असते. विकसित बाजारात कंपनीला आपले पाऊल अधिक रोवायचे आहे व त्यासाठी विकसित बाजारातील निर्यात व विक्री वाढविणे गरजेचे आहे. मारूतीने नुकतीच त्यांची नवी बलेनो सादर केली असून त्याची निर्यात १०० देशांत सुरू केली आहे. त्यात जपान बरोबरच युरोप देशांत २०१६ पासून ही मेड इन इंडिया कार निर्यात केली जाणार आहे. ही कार विकसित देशांच्या बाजारात यशस्वी ठरली तर भारत हे सुझुकीच्या भविष्यातील मॉडेल्सासाठीचे मुख्य निर्यात केंद्र होईल.

व्होक्सवॅगन, फोर्ड, ह्युंदाई यांनी आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेसाठी भारत हे निर्यात केंद्र यापूर्वीच केले आहे. येथील उत्पादन खर्च कमी असल्याने व मजुरीसाठी मोजावा लागणारा पैसाही कमी असल्याने भारत निर्यात केंद्र बनविण्यास योग्य देश आहे असे तज्ञांचे मत आहे.

Leave a Comment