धार्मिक स्थळांनीही उघडली डीमॅट अकौंट

tirumala
मुंबई – देशातला शेअर बाजार बदलतोय तसाच बदल अर्थव्यवस्थेतही होतो आहे. या सार्‍या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी धार्मिक स्थळांनाही आपली कार्यशैली बदलून आधुनिक व्हावे लागले आहे. याचे चांगले उदाहरण म्हणजे भाविकांच्या शेअर्स स्वरूपातील देणग्या स्वीकारण्यासाठी देशातील बड्या ५० धार्मिक स्थळांनी त्यांची डिमॅट अकौंट उघडली असून आणखी अनेक देवस्थाने या मार्गावर आहेत.

देशातील बडी मंदिरे, चर्चेच आणि मशीदी या सर्वांचा डिमॅट अकौंट उघडणार्‍यात समावेश असला तरी त्यात अधिक संख्येने मंदिरे आहेत. आजकाल सर्वच धार्मिक स्थळांना कॅशमध्ये देणग्या मिळण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्या ऐवजी भाविक शेअर्सच्या रूपात देणग्या देण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या स्थळांना शेअर्स स्वरूपातील देगण्या स्विकारण्याची तयारी करावी लागली आहे.त्यात आघाडी आहे ती तिरूमला तिरूपती देवस्थानची. त्यांनी डिमॅट अकौंट सुरू केल्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून वैष्णोदेवी, सिद्धीविनायक मंदिर, बाबुलनाथ, वर्धमान महावीर मंदिर, नाथद्वारा, स्वामीनारायण, शंकराचार्य मंदिर, द.भारतातील चर्चेस अशा सुमारे ५० संस्थांनी डिमॅट अकौंट सुरू केली आहेत. गेल्या कांही महिन्यात हा ट्रेंड अधिक वाढताना दिसतो आहे.

Leave a Comment