ताजमहालाच्या प्रेमात पडले मार्क झुकेरबर्ग

mark
आग्रा- फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी जगातील सात आश्चर्यापैकी एक मानल्या जाणाऱ्या ताजमहालला मंगळवारी भेट दिली. त्यांनी पाहताक्षणी आपण या वास्तूच्या प्रेमात पडल्याची कबुलीही यावेळी दिली. आपल्या काही सहकाऱ्यासमवेत त्यांनी ताजमहालास भेट दिली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास मार्क झुकेरबर्ग आपल्या सहकाऱ्यासमवेत परिसरात आला होता. ज्या वास्तूच्या सौदर्यापुढे सारे काही फिके असल्याची जाणीवही त्यांना यावेळी झाली.

ताजमहाल आपण केलेल्या कल्पनेपेक्षाही कितीतरी पटीने अधिक सुंदर असल्याची प्रतिक्रिया यावेळी मार्क झुकेरबर्ग यांनी व्यक्त केली. ताजमहालाच्या पुर्व भागात बसून त्यांनी जगातील सात आश्चर्यापैकी एक मानल्या जाणाऱ्या या वास्तूची पाहणी केली. त्यांनी काही वेळाने याबाबतची छायाचित्रे आपल्या प्रोफाईलवर पोस्ट केल्यानंतर अवघ्या सातच मिनिटात त्याला २२ हजार लाईक्स मिळाल्या. तर दोन हजार जणांनी यावर कमेंट्स दिल्या. तर ४३५ जणांनी ही पोस्ट शेअर केली.

Leave a Comment