डब्ल्यूएचओचा इशारा; प्रक्रिया केलेल्या मांसामुळे होतो कर्करोग

meat
पॅरिस- इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर या फ्रान्समधील संस्थेने प्रक्रिया केलेल्या मांसामुळे कर्करोग होत असल्याचा दावा केला असून जागतिक आरोग्य संघटनेचा एक भाग असलेल्या या संस्थेने मांसाहारावर संशोधन करताना अनेक नव्या बाबी समोर आणल्या आहेत.

जागतिक स्तरावर मांसाहाराबाबत या संशोधनामुळे नव्याने चर्चा होण्याची शक्यता आहे. या संस्थेच्या म्हणण्यानुसार प्रक्रिया केलेले मांस हे तंबाखू एवढेच कर्करोगासाठी घातक ठरू शकते. अति अल्प प्रमाणात प्रक्रिया केलेले मांस खाणाऱ्यांना हा धोका कमी असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. तर अतिमांस सेवन करणाऱ्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment