जिओनीचा इलाईफ एस ६ भारतात येतोय

jionee
जिओनीने त्याच्या ईलाइफ सिरीजमधील सर्वाधिक सडपातळ इलाईट एस सिक्स भारतात सादर केला जात असल्याची घोषणा केली असून तो १६ नोव्हेंबरच्या इव्हेंटमध्ये सादर केला जात आहे. इलाईफ सिरीजमधील कंपनीचा हा चौथा फोन आहे. यापूर्वी कंपनीने एस सेव्हन, एस ५.१, आणि एस ५.५ लाँच केले आहेत. कंपनीने ई ८ हा १०० एमपी क्वालिटी फोटो देणारा कॅमेरा असलेल्या फोनही यापूर्वी सादर केला आहे.

ई एस सिक्स हा फक्त ६ मिमी जाडीचा आहे तसेच तो हायटेक आहे. त्याला ५ इंची अमोलेड डिस्प्ले स्क्रीन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास तीन सह दिला गेला आहे. ही ग्लास १६ दशलक्ष कलर्सना सपोर्ट करते त्यामुळे पिक्चर क्वालिटी उत्तम मिळते.२ जीबी रॅम, १६ जीबी मेमरी, अमिगो ३.१ ही अँड्राईड ५.१ वर आधारलेली ओएस, १३ एमपीचा रियर ऑटोफोकस एलईडी फ्लॅशसह कॅमेरा, ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा, जिओ टॅगिंग, फेस डिटेक्शन, स्माईल डिटेक्शन, पॅनोरमा या फिचर्सही त्याला दिल्या आहेत.

Leave a Comment