[nextpage title=”जगातील टॉप टेन बाईक्स”]
कोणत्याही देशातील तरुणाईमध्ये ‘बाईक्स’ची प्रचंड क्रेझ असते. अगदी रोजच्या वापरण्यासाठी घेतलेल्या मोटारसायकलची तरुण जीवापाड काळजी घेतात. मग जगातील सर्वात महागड्या; तसेच वेगाची झिंग आणि नजरबंदी करणाऱ्या डिझाईन्सच्या बाईक्सची नुसती झलक बघायला मिळाली; तरी बाईकप्रेमींसाठी ती मेजवानीच ठरेल.
जगातील टॉप टेन बाईक्स
१) नीमॅन मार्कस
नीमॅन मार्कस ही मोटरसायकल लिमिटेड एडिशन असल्याने जगभरात या मॉडेलच्या केवळ ४५ गाड्या उपलब्ध असून त्याची किंमत आहे तब्बल ११ मिलियन डॉलर्स! या मॉडेलचे उत्पादन बंद असल्याने ही गाडी खरेदी करायची असेल तर एखाद्या लिलावाचीच वाट धरावी लागेल. मात्र किंमतीच्या मानाने या गाडीचे डिझाईन उत्तम असले तरीही तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता पुरेशी सक्षम नाही; असे अनेकांचे मत आहे. या गाडीचा सर्वाधिक वेगही प्रति तास केवळ १९० मैल आहे. ही गाडी म्हणजे ‘मशिनरीचा नावीन्यपूर्ण आविष्कार आहे;’ अशी जाहिरात कंपनीने केली असली तरीही ही गाडी म्हणजे केवळ असेंब्ली आहे; असे तिच्या टीकाकारांचे म्हणणे आहे.[nextpage title=”२) एजेएस पॉर्क्युपाईन”]
एजेएस पॉर्क्युपाईन या मोटारसायकलची निर्मिती केवळ चार आवृत्त्यांमध्ये झाली. लेस ग्रॅहम याने या गाडीवर सवारी करून सन १९४९ मध्ये एक जागतिक मोटोक्रॉस स्पर्धा जिंकली होती. या गाडीची रचना काही वर्षांनंतर बदलण्यात आली. त्यामुळे जागतिक विजेतेपद प्राप्त करणारे १९४९ मॉडेल जगभरात दुर्मिळ आहे. नीमॅन मार्कस ही उत्तम डिझाईन आणि नावीन्यपूर्ण अशी गाडी असली तरीही त्याची अवाढव्य किंमत लक्षात घेता त्याच्या तुलनेत ७ मिलियन डॉलर्स या किंमतीत एजेएस पॉर्क्युपाईन ही गाडी सर्वोत्तम मानली जाते. [nextpage title=”३) इकोस स्पिरीट”]
इकोस स्पिरीट ही गाडी गतिमान फॉर्म्युला १ कारच्या डिझाईनच्या धर्तीवर तीन अमेरिकन आणि ब्रिटिश अभियंत्यांनी संयुक्तपणे तयार केली. या गाडीचा सर्वाधिक वेग प्रति तास २३० मैल एवढा प्रचंड आहे. त्यामुळे या गाडीचा वापर करण्यापूर्वी स्वत:ला सक्षम बनविण्यासाठी इकोसच्या मुख्यालयात दोन आठवड्यांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. टायटॅनियम मालिकेत केवळ १० गाड्या बनविण्यात आल्याने तिचे दुर्मिळपण कायम राहिले आहे. बोलणे, मध्ये केले गेले. या गाडीची किंमत ३.६ मिलियन डॉलर्स एवढी आहे.[nextpage title=”४) हिल्डब्रँड अँड वूल्फम्युलर”]
हिल्डब्रँड अँड वूल्फम्युलर ही जगात उत्पादित करण्यात आलेली पहिली मोटरसायकल आहे. या गाडीचे उत्पादन केवळ सन १८९४ ते ९७ या कालावधीत करण्यात आले. या गाडीचा सर्वाधिक वेग केवळ २८ मैल प्रति तास एवढे असून वजनाला ती अत्यंत हलकी आहे. याच्या इंजिनाची ताकद अत्यंत किरकोळ असली तरी त्या काळात ज्या चढ उतारावर साध्या सायकलवरून प्रवास करणे कठीण होते. त्यापेक्षा या गाडीवरून पोहोचणे सुलभ होते. थोडक्यात ही गाडी म्हणजे इंजिन जोडलेली सायकलच! या गाड्यांपैकी बहुतेक गाड्या जर्मनी, लंडन, डेट्रॉईट, मेन, किंवा इंडोनेशिया येथील संग्रहालयांची शोभा वाढवित आहेत. या गाडीची किंमत आहे ३.५ मिलियन डॉलर्स संग्रहालयाच्या आहेत.[nextpage title=”५) यामाहा बीएमएस”]
यामाहा बीएमएस या गाडीला १,७०० सीसी व्ही ट्विन हे शक्तिशाली इंजिन आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने यामध्ये फारसे वेगळे काही नसले तरी या गाडीचे असामान्य डिझाईन या गाडीला ३ मिलियन डॉलर किंमतीच्या गाड्यांच्या पंक्तीत बसविण्यास कारणीभूत ठरले आहे. या गाडीचे आसन लाल रंगाच्या मखमलीने सजविले आहे; तर गाडीच्या उर्वरित भागाला चक्क २४ कॅरेट सोन्याने मढविले आहे. सन २०१३ पर्यंत यामाहा बीएमएस ही सोन्याचा मुलामा दिलेली एकमेव दुचाकी रस्त्यावरून दिमाखाने धावत असे. थोडक्यात आपला दिमाख आणि स्टेट्स सिंबॉल याचे प्रदर्शन घडविण्यासाठी ही गाडी सर्वोत्तम आहे.[nextpage title=”६) हर्ले डेव्हिडसन कॉस्मिक स्टारशिप”]
हर्ले डेव्हिडसन कॉस्मिक स्टारशिप ही १ मिलियन डॉलर्सपेक्षा अधिक किंमतीची एकमेव गाडी आहे. या गाड्यांना जॅक्सन पोलॉक यांच्या परंपरेतील विख्यात चित्रकार जॅक आर्मस्ट्राँग यांनी हाताने रंग दिलेला आहे. हेच या गाडीचे वैशिष्ट्य आहे. यांत्रिक कार्यक्षमतेत १.५ मिलियन डॉलर्स या किंमतीत उपलब्ध असणाऱ्या गाड्यांच्या तुलनेत काहीशी मागे असली तरीही आर्मस्ट्राँग यांच्या कलाविष्काराने या गाडीला या किंमतीच्या आवृत्तीत आणून बसविले आहे.[nextpage title=”७) डॉज टॉमहॉक व्ही १० सुपर बाईक”]
[nextpage title=”८) एनसीआर माचिया नेरा”]
‘काळा तीळ’ म्हणजेच इटालियन भाषेत माचिया नेरा! अल्डो द्रुडी या कुशल तंत्रज्ञाने या गाडीचे डिझाईन बनविले असल्याने तिचा समावेश महागड्या दुचाकीमध्ये झाला असला तरी त्यामुळे वाढलेल्या कार्यक्षमतेच्या अपेक्षा टी पूर्ण करीत नाही. हिचे नाव कितीही काव्यात्म आहे; तसेच या गाडीचे वजन आहे २९७ पौंड. या श्रेणीतील सर्वात कमी वजनाची ही गाडी आहे. या गाडीचे इंजिन १८५ अश्वशक्तीचे आहे. गाडीला ६ गिअर्स असून प्रत्येक सिलेंडरला ४ व्हॉल्वज आहेत. या गाडीची किंमत आहे २२५०० डॉलर्स.[nextpage title=”९) एमटीटी टर्बाईन स्ट्रीटफायटर”]
सन २००० मध्ये एमटीटीने वाय २ के टर्बाईन सुपरबाईक ही गाडी सादर केली. या गाडीचे उत्पादन आलिशान वाहनांचे उत्पादन करणाऱ्या जगद्विख्यात रोल्स रॉईस या कंपनीने केले होते. अॅलिसन २५०- सी १८ या इंजिनाद्वारे प्रतितास २०० मैल पर्यंत वेग गाठण्याची या गाडीची क्षमता आहे. मात्र सन २००८ मध्ये याच गाडीत सुधारणा करून कंपनीने ४२० अश्वशक्ती क्षमतेचे इंजिन असलेली स्ट्रीटफायटर ही नवी आवृत्ती विकसित केली. रोल्स रॉयस- अॅलिसन टर्बाईन या ३२० अश्वशक्ती क्षमतेचे इंजिन असलेल्या या गाडीला पिरेली डिअॅब्लोचे स्थैर्य प्रदान करणारे टायर्स बसविण्यात आले आहेत. या गाडीच्या इंजिनाची क्षमता १०० अश्वशक्तीने वाढविण्याची सुविधाही उपलब्ध आहे. या गाडीची किंमत १७५००० डॉलर्स.[nextpage title=”१०) आयकॉन शीन”]
इंग्लंडचा जगज्जेता मोटोक्रॉसविजेता बॅरी शीन याच्या गौरवार्थ मर्यादित आवृत्ती असलेल्या या गाडीला शीन याचे नाव देण्यात आले आहे. किंमतीच्या बाबतीत टॉप १० दुचाकींमध्ये या गाडीचा क्रमांक शेवटचा असला तरी एके काळी जगातील सर्वाधिक मजबूत दुचाकी; अशी आयकॉन शीनची ओळख होती. या गाडीला १४०० सीसीचे इंजिन असून या इंजिनाद्वारे गॅरेट टर्बोचार्जर चालवून २५० अश्वशक्ती ऊर्जानिर्मिती करण्यात येते. या श्रेणीतील केवळ ५२ गाड्या उत्पादित करण्यात आल्या आहेत. या गाड्यांना हाताने रंगविण्यात आले आहे. या गाड्या बाजारात आल्यानंतर प्रत्येकी १७२००० डॉलर्स या किंमतीला त्यांची विक्री झाली.