जगातील चित्रविचित्र रेस्टॉरंटस

[nextpage title=”जगातील चित्रविचित्र रेस्टॉरंटस”]
Top-Restaurants

माणसाला जगण्याइतकाच किंबहुना त्याहूनही अधिक रस खाण्यात असतो. जिव्हा तृप्ती झालेली असेल तर अगदी चिडखोर माणसाच्या चित्तवृत्तीही प्रफुल्लीत असतात. भारतात तर पुरूषांना खूष करण्याचा मार्ग पोटातून जातो अशी म्हणच आहे. म्हणजे नवर्‍याची मर्जी राखायची असेल तर त्याला चवीढवीचे खायला घाला. आता पोटाबरोबरच डोळे निवतील आणि डोळ्यांनाही सौंदर्याची मेजवानी मिळेल अशी सोय असेल तर दुग्धशर्करा योगच की नाही? जगात अशा प्रकारे पोट आणि डोळे तृप्त करणारी कांही खास रेस्टॉरंट तुमच्या माहितीसाठी. आयुष्यात एकदा तरी यातील किमान एखाद्या रेस्टॉरंटला भेट देण्याचा प्रयत्न अवश्य करा.

1-El-Diablo-Restaurant-–-Te

१)एल डिअॅब्लो रेस्टॉरंट

स्पेनमधील हे रेस्टॉरंट जगातील युनिक बार्बेक्यू कन्सेप्ट देणारे आहे. कारण येथे मुळी ज्वालामुखीच्या उष्णतेवरच पदार्थ भाजले जातात. येथील स्वयंपाकघराच्या खाली ६ फुटावर जिवंत ज्वालामुखी आहे. त्यामुळे सुरक्षेची काळजी घेताना हे रेस्टॉरंट बेसाल्ट खडकांत सहा थरांत बांधले गेले आहे. हा ज्वालामुखी १९ व्या शतकात भडकला होता मात्र तेव्हापासून तो थंड आहे. या रेस्टॉरंटमधून आजूबाजूचा परिसर आणि नॅशनल पार्कचा व्ह्यू सूर्यास्ताच्या वेळी पाहणे हा जीवनातला मोठा आनंद ठरू शकतो.[nextpage title=”२) सारनिक रेस्टॉरंट”]

2-Sarnic-Restaurant-–-Istan

ऐतिहासिक सेटींगमध्ये नटलेले इस्तंबूलमधील हे रेस्टॉरंट खास म्हणावे लागेल. येथील डायनिंग रूम हजार वर्षांपूर्वीच्या जुन्या रोमन पद्धतीने सजविली गेली आहे. लोखंडी शँडेलियर्समधून मंद प्रकाश येथे पसरतो आणि याचे घुमटाकार छत सहा दगडी खांबांनी तोलून धरलेले आहे. येथे गेलात की जुन्या काळात आल्याचा भास होतो. टेकडीच्या माथ्यावर अरूंद ऑटोमन स्टाईलच्या रस्त्याने येथे जाता येते. येथे शहराचा इतिहास समजून घेता येतो म्हणजे खाण्याबरोबरच ज्ञानातही भर पडते. येथे संगीताची मेजवानीही मिळते.[nextpage title=”३) ३६० डिग्री रेस्टॉरंट”]

3-360-Degrees-Restaurant,-P

थायलंडचे नंदनवन म्हटले जाणार्‍या निसर्गसुंदर फुकेत येथील लायानबीच हिलटॉप रेस्टॉरंट हे आसपासचे सौंदर्य ३६० अंशातून पाण्याची सोय असलेले रेस्टॉरंट आहे. त्याचे नावच मुळी ३६० डिग्री आहे. येथून अंदमानचा सुंदर समुद्र पाहता येतो. येथे खाण्यापिण्याचा आनंद घेत असतानाच सर्व परिसर न्याहाळता येतो. सूर्यास्ताच्या वेळी ही नजरबंदी अधिक असते हे खरे मात्र दिवसाही येथून दिसणारा व्हू तनमनाला थंडावा आणि शांतता देणारा आहे. येथील खाद्यपदार्थही अतिशय चविष्ट आहेत आणि जगभरातील पदार्थोचे त्यात फ्यूजन करून ते अधिक स्वादभरे केले जातात.[nextpage title=”४)स्टकली स्काय डायनिंग”]

4-Stuckli-Sky-Dining

स्वित्झर्लंडच्या नयनरम्य आल्प्स पर्वत रांगातील पहाडांवर हे फिरते रेस्टॉरंट आहे. नजर पोहोचेल तेथेपर्यंत केवळ सौंदर्य आणि सौंदर्यच दाखविणारे हे रेस्टॉरंट स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामध्ये भोजनाचा आस्वाद देऊ करते. म्हणजे येथे दोरावर टांगलेल्या गोंडोलातूनच जेवणाची मौज लुटता येते, येथून सूर्यास्त पाहणे म्हणजे आनंदाची परमावधीच.[nextpage title=”५) स्नो कॅसल रेस्टॉरंट”]

5-Snow-Castle-Restaurant

फिनलंडमधील हे रेस्टॉरंट नावावरून बर्फाचे असावे असे वाटत असेल तर ते अगदी खरे आहे. हे रेस्टॉरंट बर्फातच कोरले गेले आहे आणि फक्त हिवाळ्यातच ते सुरू असते. दरवर्षी पुन्हा नव्याने ते खोदावे लागते. जानेवारी अखेर हे रेस्टॉरंट सुरू असते आणि दरवेळी नवीन पद्धतीने वास्तुशिल्प येथे खोदले जाते. उणे पाच तापमानात येथे जेवावे लागते. बसायला खुर्च्या बर्फातूनच कोरलेल्या पण फरच्या सहाय्याने कव्हर केलेल्या असतात. येथे किंग सामन, पर्च या अतिश्रीमंती खाण्यात मोडणार्‍या माशांपासून बनविलेले पदार्थही सर्व्ह केले जातात.[nextpage title=”६) ट्री पॉड डायनिंग”]

6-Tree-Pod-Dining

बँकॉकच्या सोनव्हा किरी येथील या रेस्टॉरंटमधील जेवणाचा अनुभव एकदा तरी घ्यायला हवाच. येथे झाडांवर उंच १६ फुटांवर विणलेल्या बांबू टोपल्यातून वर नेले जाते आणि तेथे जेवण सर्व्ह केले जाते. म्हणजे बालपणी झाडावर बसून पक्ष्यांसारखे खाण्याची जी इच्छा असते ना त्याची पूर्ती येथे होऊ शकते. तसेच ट्री हाऊसमध्ये राहिल्याचा आनंद मिळतो तो वेगळा. येथे वेटर्स झिपलाईन ने वर येऊन तुम्हाला खाद्यपदार्थ पुरवितात. या पॉडमध्ये बसल्यावर आजुबाजूचा परिसर, हिरवीगार शेती आणि निळा समुद्र आणि किनारा डोळेभरून पाहता येतो.[nextpage title=”७) लॅबासीन वॉटरफॉल रेस्टॉरंट”]

7-Labassin-Waterfall-Restau

फिलिपिन्सच्या विला इक्यडोर प्लांटेशन मधील हे रिसॉर्ट धरणाच्या परिसरात बांधले गेले आहे. येथे बांबूची टेबले आणि धबधब्याच्या सानिध्यात जेवण असा आनंद लुटता येतो. हा धबधबा नैसर्गिक नाही तरीही त्याच्या चमकदार फेसाळत्या पाण्यात पाय बुडवून अंग सैलावून बसणे यासारखे दुसरे सुख कोणते? भोवतीचे गर्द हिरवे जंगल मनालाही शांत निवांत करते. येथे जेवण बफे स्टाईलचे असते आणि प्रामुख्याने फिलिपिन्सचे स्थानिक पदार्थ येथे मिळतात. त्यात मासे, फळे यांचा समावेश असतो.[nextpage title=”८)स्काय डायनिंग सिंगापूर”]

8-Sky-Dining-at-The-Singapo

मरिना बे सँड परिसरातील हे लक्झुरियस स्काय डायनिंग रेस्टॉरंट जगातले मोठे ऑब्झर्व्हेशन व्हिल असलेले रेस्टॉरंट आहे. येथून सूर्यास्त पाहाययचाच पण येथील व्हीआयपी डायनिंग रूममध्ये पाहुण्यांना सेमी प्रायव्हेट डायनिंग कॅप्सुलमध्ये बसविले जाते. हे ऑब्झर्व्हेशन व्हील म्हणजे फिरते चाक इतके मंद गतीने फिरते की त्याची जाणीवही होत नाही. येथे मल्टी कोर्स डिनरचा आस्वाद घेता येतो.[nextpage title=”९) ला ज्यूल्स व्हर्नेस”]

9-Le-Jules-Vernes

पॅरिसमधल्या सर्वाधिक जास्त भेट दिल्या जाणार्‍या ठिकाणी म्हणजे जगप्रसिद्ध आयफेल टॉवर वर असलेले हे रेस्टॉरंट टॉवरच्या दुसर्‍या पातळीवर आहे. येथून आसपासचा परिसर शांतपणे न्याहाळता येतो. येथे येण्यासाठी खासगी लिफटही आहे. त्यामुळे गर्दी टाळून आणि वर जाण्यासाठी लांब रांगातून सुटका करून घेऊन येथे येता येते. येथे प्रामुख्याने फ्रेंच पदार्थ सर्व्ह केले जातात आणि जेवणात वाईन्सची रेलचेल असते.[nextpage title=”१०)ट्री हाऊस रेस्टॉरंट”]

10-Treehouse-Restaurant

झाडाच्या उंच शेंड्यावर बसून आसपासचा परिसर न्याहाळायची आणि त्याचबरोबर विविध चवींच्या पदार्थांचा आस्वाद घ्यायची कल्पना कशी वाटते? ही कल्पना आवडली असेल तर न्यूझीलंडच्या ट्री हाऊस रेस्टॉरंटला भेट देण्याशिवाय पर्याय नाही. पॉड शेपच्या डायनिंग रूम्स येथे जमिनीपासून १० मीटर उंचीवर झाडांतच उभारल्या गेल्या आहेत. तेथे ताजे पण सिझनल फूड मिळते आणि जंगलाचा आसपासचा परिसर पाहता येतो. ऑकलंडपासून ४५ मिनिटांच्या अंतरावर हे रेस्टॉरंट आहे. दिवसा जंगलाचे सौंदर्य येथून टिपता येते तर रात्री हे रेस्टॉरंट स्वतःच झगमगत असते.[nextpage title=”११) आऊट डोअर पॉपअप डिनर्स”]

11-Outdoor-pop-up-dinners-i

जेवणाची ही एक वेगळीच कल्पना आहे. इटालीतील फेरारा येथे ही संकल्पना रूजली आहे. यंदा सप्टेंबरमध्ये येथे पाचवे आऊट डोअर पॉप अप पार पडले. यामध्ये सामील व्हायचे असेल तर अगोदर तिकीट घ्यावे लागते. त्यात टेबल खुर्च्या आणि डिनरमधल्या दोन मेन्यूतून निवड करावी लागते. आपला फोननंबरही द्यावा लागतो कारण हे डिनर मुळी दरवर्षी गुप्त ठिकाणी आयोजित केले जाते. हे ठिकाण अगदी शेवटच्या क्षणी सांगितले जाते आणि टेस्क्स मेसेज व ट्विटवरून तीन मेसेज दिले जातात. त्यात जेवणाची वेळ, टेबल खुर्च्या कुठून घ्यायच्या त्याची सूचना आणि तुम्ही निवडलेले जेवण याची माहिती असते. हा उपक्रम अतिशय लोकप्रिय ठरला असून जेवणासोबत संगीत आणि मनोरंजनाची व्यवस्थाही केलेली असते.[nextpage title=”१२)ग्रॅटो पॅलॅझी”]

12-Grotta-Palazzese

इटालीतीलच हे आणखी एक ठिकाण. येथील हे रेस्टॉरंट फक्त उन्हाळ्याच्या सीझनमध्येच खूले असते. येथून निळ्याशार समुद्राचे पोटभर दर्शन घेता येते आणि येथील रूचकर पदार्थांनी पोट तुडुंब होते. चुनखडीच्या गुहांमध्ये हे रेस्टॉरट असून येथून खडकाळ किनारे, फेसाळता समुद्र निरखण्यासाठी निवांत वेळ मिळतो. येथून सूर्यास्त पाहणे म्हणजे एखाद्या परिकथेतील अनुभव. सूर्य अस्ताला जात असताना आणि सांजवेळ होताना लागणारी हुरहुर अनुभवेपर्यंत हळूवार प्रकाश झिरपू लागतो आणि पुन्हा एकदा मन आनंदाच्या झुल्यावर झुलू लागते.[nextpage title=”१३) इथा अंडरसी रेस्टॉरंट”]

13-Ithaa-Undersea-Restauran

मालदीवच्या रंगाली आयलंडवरील हे सर्वात सुंदर रेस्टॉरंट जगातील सुंदर रेस्टॉरंट म्हणून प्रसिद्ध आहे. समुद्रात पाच मीटर खोल ते बांधले गेले आहे. सभोवतीचे निळे पाणी आणि समुद्री जीवांचे दर्शन येथील जेवणाचा अनुभव आणखी सुंदर करतात. येथील डायनिंग रूमला काचेचे सिलिंग आणि काचेच्याच भिंती आहेत. तेथून प्रवाळांचे खडक, माशांच्या झुंडी, शार्क मासे व अन्य समुद्री जीव सुरक्षितपणे न्याहाळता येतात. येथे मुख्यत्वे युरोपियन क्यूझीन्स सर्व्ह केली जातात तसेच लॉबस्टर व कॅव्हीयर माशांच्या चवदार पाककृतीही जिभेचे चोचले पुरविण्यास तप्तर असतात.

 

Leave a Comment