मारुती सुझुकीने लॉन्च केली हॅचबॅक बलेनो

baleno
नवी दिल्ली- आपली नवी हॅचबॅक कार ‘बलेनो’ मारुती सुझुकी कंपनीने लॉन्‍च केली असून ही कार पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये सादर करण्‍यात आली आहे. कंपनी या नवीन गाडीची विक्री प्रीमियम डीलरशिप चेन ‘नेक्‍सा’च्या माध्यमातून करणार आहे. बलेनो कारचे सिग्‍मा, डेल्‍टा, झिटा व अल्‍फा, असे चार मॉडेल मारुतीने बाजारात उतरवले आहे. बलेनो कारच्या बेसिक मॉडेलची ‍किंमत ४.९९ लाख रुपये (एक्स शो-रूम दिल्ली) आहे.

‘बलेनो’ ही कार पेट्रोल व डिझेल व्हेरिएंटमध्ये मारुती सुझुकीने लॉन्च केली असून पेट्रोल मॉडेलमध्ये १.२ लिटरचे मॅन्युअल व सीव्हीटी गिअरबॉक्‍स देण्यात आले आहे. तर डिझेल मॉडेलमध्ये १.३ लिटरचे इंजिन बसवण्यात आले आहे. यात मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. डिझेल कारची ३,९९५ एमएम, रुंदी १,७४५ एमएम व उंची १,५०० एमएम एवढी आहे. कारच वजन ९६० किलोग्रॅम आहे. या कारचे वजन स्विफ्टपेक्षा १०० किलोग्रामने कमी आहे. मात्र, स्विफ्टपेक्षा ही कार लांबीला थोडी जास्त आहे.

नव्या प्‍लॅटफॉर्मवर विकसित करण्‍यात आलेल्या बलेनोमध्ये ३५५ मीटरचा बूट स्पेस देण्यात आला आहे. या कारची फ्यूल टाकीची क्षमता ३७ लिटर आहे. कारला १५ इंचाचे व्‍हील्‍स बसवण्यात आले आहे. सीव्हीटी सुविधा असलेली ही मारुतीची पहिली कार आहे.

Leave a Comment