ई-कॉमर्सवर म्युच्युअल फंड विक्री होणार शक्य

e-commerce
नवी दिल्ली : दिवसेंदिवस गुंतवणूकदारांची संख्या ई-कॉमर्स संकेतस्थळांवर वाढत असल्याने या वर्षअखेरपर्यंत भारतात सहाशे कोटी रुपयांची उलाढाल होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सिक्युरिटीज अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ई-कॉमर्स माध्यमातून म्युच्युअल फंड विक्रीला परवानगी देण्याचा विचार करत आहे.

जलदगतीने म्युच्युअल फंड उद्योग वाढत आहे. आशिया आणि भारतातील ई-कॉमर्स बाजार विकासाच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या काही वर्षांतील वाढ आणि सध्या देशातील म्युच्युअल फंड कंपन्यांची मालमत्ता १३ लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. विशेषत: किरकोळ गुंतवणूकदार अजूनही दूर राहिल्याने यात अजूनही प्रचंड वाढीची संधी आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड कमी किंमतीत खरेदी (कॉस्ट-ईफेक्टिव मॅनर) करता यावा यासाठी सेबी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर म्युच्युअल फंडच्या खरेदी-विक्रीला परवानगी देण्याचा विचार करीत आहे. यू.के. सिन्हा सेबीचे अध्यक्ष होण्यापूर्वी २०११ मध्ये स्वत: अग्रगण्य म्युच्युअल फंड असणा-या यूटीआय म्युच्युअल फंडचे काम बघत होते.

Leave a Comment