ब्राझीलमध्ये होते बम बम स्पर्धा

bum-bum
ब्राझील – आपल्याला जगात काय काय नवीन घडते याची साधी भनक देखील नसते. त्यात काही संशोधनांचा, काही तर्क-वितर्क यांचा तर काही वेगवेगळ्या स्पर्धाचांही समावेश असतो. त्यातच भर पडली आहे ब्राझीलमध्ये होणाऱ्या एका स्पर्धेची. या स्पर्धेचे नाव ‘बम-बम स्पर्धा’ असून या स्पर्धेत सर्वात सेक्सी हिप्स असणाऱ्या महिला स्पर्धकाची विजेता म्हणून निवड केली जाते.

या स्पर्धेचे आयोजन मागील पाच वर्षांपासून केले जात असून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सुंदर आणि सेक्सी हिप्स असलेल्या महिलेची मिस बम बम म्हणून निवड केली जाते.

सर्वात सेक्सी बट हा पुरस्कार या स्पर्धेतील प्रथम दोन विजेत्यांना दिला जातो. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धक महिलांना सेलिब्रेटीसारखी वागणूक दिली जाते. अल्पवधीतच प्रसिध्द झालेल्या या स्पर्धेला ब्राझीलच्या लोकांची अधिक पसंती आहे. मात्र याच स्पर्धेवरून तेथे अनेकदा वादही झाल्यामुळे ही स्पर्धेची एक वादग्रस्त स्पर्धा म्हणूनही ओळख निर्माण झाली आहे. बम बम स्पर्धेतील स्पर्धक पंचांना लाच देतात, असा आरोपही बऱ्याचदा झाला आहे आणि आजही होत आहे. आता ती लाच कोणत्या स्वरुपात दिली जाते, याबाबतीत अनेक चर्चा चवीने चर्चील्या जातात.

Leave a Comment