झुकेरबर्ग दांपत्य काढणार विशेष शाळा

school
फेसबुकचा संस्थापक मार्क व त्याची पत्नी प्रिसिला सिलीकॉन व्हॅलीमध्ये ईस्ट पालो अल्टो येथे मुलांसाठी विशेष शाळा सुरू करणार आहेत. या शाळेत मुलांना अभ्यासाबरोबरच आरोग्य देखभालीचे शिक्षणही दिले जाणार आहे. ही योजना प्रिसिला चान हिचीच असून शाळेचे नांव द प्रायमरी स्कूल असेल असे जाहीर केले गेले आहे.

मार्क झुकेरबर्गने दिलेल्या माहितीनुसार मुलांच्या शिक्षणात अभ्यासाबरोबरच आरोग्याचे महत्त्व ही मोठे असते. जी मुले आरोग्यपूर्ण असतात त्यांची शिकण्याची क्षमता अधिक असते. प्रिसिला स्वतः बालरोगतज्ञ आणि शिक्षक आहे. वर्गात आजारी असणारी मुले मागे पडतात, त्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ शकतात हे लक्षात घेऊन शिक्षणाबरोबरच त्यांना आरोग्य संवर्धनाचे शिक्षणही या शाळेत दिले जाणार आहे.