कोलंबियातील संशोधकांचे महत्वपूर्ण संशोधन; आता टकलावरही उगवणार केस

univesity
न्यूयॉर्क: कोलंबियाच्या संशोधकांनी आपल्या संशोधनांतून एक असे औषध शोधले आहे ज्यामुळे आपल्याला टक्कल पडले असेल तर त्यावर आता सहज केस उगवतील.या औषधाची चाचणी उंदरांवर यशस्वी झाली असून या प्रक्रियेत केवळ ५ दिवसांची ट्रिटमेंट घेतल्यानंतर १० दिवसांत केसांची वाढ सुरू होते.

याबाबत प्राप्त माहितीनुसार कोलंबिया विद्यापीठाच्या मेडिकल सेंटरमध्ये वैज्ञानिकांनी एक असे औषध शोधले आहे ज्यामुळे टक्कल पडलेल्यांच्या डोक्यावरही केस उगवतील. याबाबत बोलतांना संशोधक डॉक्टर एंजेला एम क्रिस्टियानो यांनी सांगितले की या औषधाचा शोध लावण्यासाठी त्यांनी उंदरांचा वापर केला. उंदरावर यशस्वी चाचणीमुळे हे स्पष्ट झाले आहे की, आता मनुष्यावर पण हे यशस्वी होईल. यासाठी दोन उंदरांवर औषधाचा प्रयोग केला गेला. औषध अशा ठिकाणी वापरले गेले जिथे कधीच केस उगवले नाहीत. यात एका उंदराचे केस होते आणि एकाचे केस नव्हते. यानंतर जवळपास ३ आठवड्यांनंतर उंदरांमधील बदल दिसून आला.

हे औषध केसांच्या वाढीस मदत करते असे क्रिस्टियानो यांचे म्हणणे आहे. तीन आठवड्यानंतर ज्या उंदरावर याचा प्रयोग केल्यानंतर त्याचे परिक्षण केले असता तेव्हा त्याचे केस पूर्णपणे उगवलेले होते. कोणत्याही अडचणीशिवाय या औषधांमुळे केस नसणाऱ्यांना याचा फायदा होईल, केस उगवतील. ५ दिवस हे औषध लावल्यानं १० दिवसांनंतर केसांची वाढ सुरू होईल असे संशोधकांच्या मते आता स्पष्ट झाले आहे