दुबईत मालमत्ता खरेदीत भारतीयांची आघाडी

dubai
दुबईत मालमत्ता खरेदी करणार्‍या विदेशी नागरिकांत भारतीयांनी यंदाही आघाडी घेतली असून दुबई सरकारने २०१५ च्या पहिल्या सहामाहीत झालेल्या परदेशी गुंतवणुकीचे जे आकडे दिले आहेत त्यानुसार या काळात मालमत्तांचे ३०१७ व्यवहार झाले आहेत. त्यात भारतीयांनी सुमारे २ अब्ज डॉलर्स इतक्या रकमेची मालमत्ता खरेदी केली आहे. दुबईत मालमत्ता खरेदीत भारतीय नंबर १ वर आहेत.

सुमान्सा एग्झीबिशन कंपनीचे प्रमुख सुनील जायस्वाल या संदर्भात माहिती देताना म्हणाले की त्यांच्या कंपनीतर्फे दुबईत प्रॉपर्टी मेळ्याचे आयोजन केले जाते. येत्या ६ ते ८ नोव्हेंबरला भारतातही दुबई प्रॉपर्टी शो आयोजित केला जाणार आहे. स्थावर गुंतवणुक करण्याची मानसिकता भारतीयांच्यात मोठ्या प्रमाणावर आहे.दुबईत भारतीय मोठ्या संख्येने मालमत्ता खरेदी करत आहेत. डाऊन टाऊन, मरीना, जुमैरा र्टॉवर्स, द पाम आदी भागात ही खरेदी केली जात आहे. या खरेदीमागे मुख्यत्वे जागा भाड्याने देऊन उत्पन्न मिळविणे अथवा भाव वाढले की विकून त्यातून नफा मिळविणे हाच उद्देश आहे.

Leave a Comment