दिल्ली आयआयटीत झुकेरबर्कचा प्रश्नोत्तर कार्यक्रम

mark
दिल्ली – फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग २८ आकटोबरला भारतीयांशी प्रश्नोत्तर रूपात संवाद साधणार आहे. दिल्लीच्या आयआयटीत हा टाऊनहॉल प्रश्नोत्तर कार्यक्रम होणार असल्याचे झुकेरबर्गने पोस्ट केले आहे. झुकेरबर्ग म्हणतो, सोशल मिडीयावर भारतीय सर्वाधिक सक्रीय आहेत. या माध्यमातून ते फेसबुकशीही जोडलेले आहेत आणि आज भारतात १३ कोटी नागरिक फेसबुकशी संलग्न आहेत. त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची इच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे.

टाऊनहॉल प्रश्नोत्तरे ही एक अनौपचारीक बैठकच आहे आणि यात कुणीही एखाद्या मान्यवर व्यक्तीबद्दल प्रश्न विचारू शकतात, त्या व्यक्तीबद्दलची मते व्यक्त करू शकतात. प्रश्नोत्तर रूपात होणार्‍या या कार्यक्रमात कांही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी आणि त्यापूवी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी उपस्थिती लावली होती. मार्क दिल्ली कार्यक्रमात लाईव्ह ऑडियन्सच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे. त्यासाठी प्रश्न पाठवा आणि एका प्रश्नासाठी व्होट करा असे आवाहन त्याने केले आहे.

Leave a Comment