आयफोनला टक्कर देण्यासाठी एचटीसीचा वन ए९

htc
मुंबई : न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमात एचटीसी मोबाईल कंपनीने आपला ए९ हा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन लवकरच भारतीय मोबाईलप्रेमींसाठी देखील दाखल होणार आहे. भारतीय बाजारपेठेसह जगभरात हा स्मार्टफोन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च केला जाणार आहे. या स्मार्टफोनची न्यूयॉर्कमध्ये किंमत ३९९ डॉलर म्हणजे भारतीय २६ हजार रुपये एवढी आहे.

एचटीसीचा नवा स्मार्टफोन ऑक्टोबरमध्ये लॉन्च होण्याबाबतची माहिती काही दिवसांपूर्वीच एचटीसीचे सीईओ चेर वॉन्ग यांनी दिली होती. अखेर एचटीसी वन ए९ न्यूयॉर्कमध्ये लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन मेटल यूनिबॉडीमध्ये आहे. स्लीम आणि ७.२६ एमएम असल्यामुळे एचटीसीच्या या नव्या स्मार्टफोनची अॅपलच्या आयफोनशी स्पर्धा असणार आहे.

काय खास वैशिष्ट्य आहेत एचटीसी वन ए९
याचा डिस्प्ले ५ इंचाचा, पिक्सेल रिझॉल्युशन १०८०×१९२० एवढे आहे. याचा रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा, तर फ्रंट फेसिंग कॅमेरा ४ मेगापिक्सेलचा दिला गेला आहे. याफोनवर ४ कोटेड गोरिल्ला ग्लास आहे. यात ६१७ स्नॅपड्रॅगन चिपसेट आणि प्रोसेसर ६४ बिट्सचा ऑक्टो-कोर देण्यात आला आहे. याचे रॅम २ जीबी आहेत तर इंटरनल स्टोरेज १६ जीबी आणि २टीबी पर्यंत वाढवण्याची सुविधा देखील देण्यात आली आहेत. याचे ऑपरेटिंग सिस्टम ६.० मार्शमेलो वर आधारित आहे. बॅटरीची क्षमता २१५० mAh एवढी आहे. हा स्मार्टफोन ३जीबी रॅम, ३२जीबी इंटरनल स्टोरेजमध्येही उपलब्ध आहे.
हा स्मार्टफोन घेणाऱ्यांसाठी एचटीसीने यामध्ये बूम साऊंड इंटिग्रेशन दिला आहे आणि ६ महिन्यांपर्यंत ग्राहकांना मोफत गूगल प्ले म्युझिक उपलब्ध करुन दिला आहे. शिवाय, युएसबी,वायफाय सुविधा, ब्लूटूथ, ३जी आणि ४जी सपोर्ट सुविधा दिली आहे.

Leave a Comment