महिंद्राने लॉन्च केली ‘गस्टो’ची स्पेशल एडिशन

mahindra-gusto
मुंबई : सणासुदीच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक वस्तूंसोबत दुचाकी-चारचाकींचीही मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. हेच लक्षात घेऊन महिंद्रा कंपनीने गस्टोची नवी एडिशन लॉन्च केली आहे.

ऐन दिवाळीत महिंद्राने दुचाकीप्रेमींना खुश करण्याची योजना आखल्याचे दिसत असून कारण काही दिवसांपूर्वीच महिंद्राने ‘मोजो’ ही बाईक लॉन्च केली आणि आता गस्टोची नवी एडिशन लॉन्च केली आहे. गस्टोच्या नव्या एडिशनची दिल्लीमध्ये ४९ हजार ३५० रुपये एवढी किंमत आहे.

केवळ टॉप व्हीएक्स ट्रिममध्ये महिंद्राची स्पेशल एडिशन गस्टो उपलब्ध असेल. ही स्कूटर मजेंटा आणि आईस कूल रेड या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. दिवाळीदरम्यान गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोफत विमा काढून दिला जाणार आहे.

१०९.६ सीसी, एअर कूल्ड, फोर-स्ट्रोक, ८ बीएचपी क्षमतेचे सिंगल सिलेंडर पेट्रोल इंजिन आणि ९ एनएमचे टॉर्क महिंद्रा गस्टोमध्ये असणार आहे.