फिटनेस ट्रॅकर ‘मिसफिट शाईन’चे अपडेटेट व्हर्जन लॉन्च

misfit-shine
मुंबई : मिसफिट या अमेरिकन कंपनीने ‘मिसफिट शाईन २’ लॉन्च केले असून हे वियरेबल डिव्हाईस मिसफिट शाईनचे अपडेटेड व्हर्जन आहे. याची किंमत ६ हजार ५०० रुपये एवढी आहे. भारतीय गॅझेटप्रेमींसाठीही मिसफिट वियरेबल उपलब्ध करण्यात आले आहे.

याआधीच्या मिसफिट शाईनपेक्षा स्लीम असलेल्या डिव्हाईसची बॉडी अॅल्युमिनिअमने बनवली गेली आहे. या डिव्हाईसचे डायमेन्शन ८mm x ३.३mm आहे. उत्तम फीचर्सही असलेल्या या डिव्हाईसला १२ एलईडी लाईट्स दिल्या गेल्या आहेत. यामध्ये व्हायब्रेशन मोटरही दिली आहे. शिवाय टच रिस्पॉन्ससाठी कॅपसिटीव्ह सेन्सरचीही सुविधा आहे.

३-एक्सिस एक्सलेरोमीटर आणि ३-एक्सिस मॅग्नेटोमीटरही यामध्ये दिले आहेत. ज्यामार्फत रोटेशनल मूव्हमेंट्स ट्रॅक करता येतात. यासोबत एक ट्रॅकरही उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुम्ही एका ठिकाणी खूप वेळ बसला असाल, तर तुम्हाला अलर्ट करण्याचे काम करते.

कंपनीने यात एक कॉईन सेल बॅटरी असल्याचा दावा केला आहे. ही बॅटरी ४ ते ६ महिन्यांपर्यंत काम करते. ४.१ ब्लूटूथसोबत वॉटर रेसिस्टंट असे हे डिव्हाईस आहे.

Leave a Comment