शिओमीची नाईनबोट मिनी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच

ninebot
स्मार्टफोन क्षेत्रातील अग्रणी चिनी कंपनी शिओमीने सोमवारी बॅटरीवर चालणारी पहिली सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरची किंमत २०५०० रूपये असून तिचे नाव आहे नाईनबोट मिनी स्कूटर. या निमित्ताने शिओमीने दुचाकी वाहन क्षेत्रात प्रवेश केला असला तरी ही स्कूटर मार्केटमध्ये कधी येणार हे स्पष्ट केलेले नाही.

या स्कूटरसाठी विमान बनविण्यासाठी वापरले जाणारे एरोस्पेस ग्रेड तंत्रज्ञान वापरले गेले आहे. शिओमीने चिनी ट्रान्स्पोर्टेशन रोबो फर्म नाईनबोट सह ही स्कूटर बनविली आहे. या स्कूटरचे वजन १२.८ किलो असून ती एका तासात १६ किमी अंतर कापते. एकदा चार्ज केलेली बॅटरी २२ किमी अंतर जाईपर्यंत पुरते. शिवाय युजर ही स्कूटर स्मार्टफोन अॅपच्या सहाय्याने नियंत्रित करू शकतो. स्पीडोमीटर, ट्रॅफिक डेटा, व स्कूटर बिघडत असल्याची सूचना त्यातून मिळते. ही स्कूटर पायाने चालविता येते आणि थांबविताही येते. सध्या ती काळ्या आणि पांढर्‍या अशा दोन रंगात उपलब्ध केली गेली आहे.

Leave a Comment