भारतीय को-फाउंडरने विकली सॅनडिस्क कंपनी

sandisk
नवी दिल्ली- कॅलिफोर्नियातील मेमरीकार्ड मेकर कंपनी सॅनडिस्क खरेदी करण्‍याची तयारी कॉम्प्यूटर हार्ड डिस्क मेकर ‘वेस्टर्न डिजिटल कंपनी’ने केली आहे. या कंपनीचे को-फाउंडर भारतीय वंशाचे संजय महेरोत्रा आहेत. आपली कंपनी विकण्याचा निर्णय महेरोत्रा यांनी घेतला आहे. ही डील १.२० लाख कोटी रुपयांत झाल्याची माहिती मिळाली आहे. महेरोत्रा डील पूर्ण झाल्यानंतर वेस्टर्न डिजिटलच्या संचालक मंडळात सहभागी होणार आहेत.

जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी फ्लॅश मेमरी चिप निर्माता सॅनडिस्क ही ओळखली जाते. ८६०० कामगार कंपनीत काम करतात. कंपनीचे मार्केट कॅप जवळपास १५ बिलियन डॉलर एवढे आहे.

Leave a Comment