अॅपल स्टोअर मधून शेकडो अॅप काढली जाणार

app
अॅपल या जगप्रसिद्ध कंपनीने त्यांच्या स्टोअरमधून शेकडो अॅप्स काढून टाकली जाणार असल्याची घोषणा केली आहे. या अॅपमध्ये गुप्तपणे चिनी सॉफ्टवेअर लावले गेल्याचे स्पष्टीकरण त्यामागे दिले गेले असून ही अॅप युजरची ईमेल सारखी वैयक्तीक माहिती जमा करण्यास सक्षम असल्याचे म्हटले गेले आहे. अॅपलच्या म्हणण्यानुसार ही अॅप्स योमी या जाहिरात कंपनीने दिलेली आहेत.

अॅपलच्या म्हणण्यानुसार ही चिनी सॉफ्टवेअर गुप्तपणे या अॅपमध्ये लावली गेली आणि युजरच्या परवानगी शिवाय त्याची वैयक्तीक माहिती मिळविणारी अॅप सॉफ्टवेअरमध्ये अॅड करणे हे नियमाचे उल्लंघन आहे व त्यामुळे ही अॅप स्टोअसमध्ये यापुढे मिळू शकणार नाहीत. मोबाईल विश्लेषक संस्थेने अॅपलच्या या निर्णयाचे स्वागत केले असून प्रथमच अॅपलने अॅप प्रक्रियेत समजूतदार पणा दाखविल्याचे मत व्यक्त केले आहे.

Leave a Comment