लेनोवाने लॉन्च केला ३६० अंशात स्क्रीन वळवणारा ‘योगा ३००’!

lenova
मुंबई : आपला नवीन लॅपटॉप ‘योगा ३००’ मोबाईल आणि लॅपटॉप निर्माता कंपनी लेनोवोने लॉन्च केला आहे. सडपातळ, हलका, टचस्क्रीन आणि कन्व्हर्टेबल असा हा मल्टिपर्पज लॅपटॉप आहे.

या लॅपटॉपची स्क्रीन ३६० अंशात तुम्ही फिरवू शकता. या व्यतिरिक्त हा लॅपटॉप अगदी सडपातळही आहे. लॅपटॉपच्या पृष्ठभागावर मॅट फिनिश डिझाईन आहे. लॅपटॉपला फूल साईज किबोर्ड देण्यात आला आहे. घरी, ऑफिसमध्ये आणि हलके मल्टिमीडिया टास्क यावर आरामात केल्या जाऊ शकतात.

डाव्या बाजुला केनिंग्सटन लॉक स्लॉट, प्रॉपरायटरी पॉवर कनेक्टर, यूएसबी २.० पोर्ट, एसडी कार्ड रिडर, रोटेशन लॉक बटन, वॉल्यूम रॉकर आहे. तर लॅपटॉपच्या उजव्या बाजुला इथरनेट पोर्ट, फूल साईज HMDI पोर्ट, यूएसबी ३.० पोर्ट, एक यूएसबी २.० पोर्ट, पॉवर बटन आणि काही एलईडी नोटिफिकेशन लाईटस देण्यात आले आहे.

२.१६ गिगाहर्टझ पेंटियम क्वॉड कोर प्रोसेसर, ४ जीबी रॅम आणि ५०० जीबी हार्ड ड्राईव्ह यामध्ये देण्यात आली आहे. दोन सेलची इंटरनल बॅटरी जवळपास ४-५ तास आरामात चालते. हा लॅपटॉप २८,७९० रुपयांत उपलब्ध आहे. तुम्ही जर लॅपटॉप खरेदीचा विचार करत असाल स्वस्तात मस्त असा हा ऑप्शन ठरू शकतो.

Leave a Comment