लवकरच येत आहे जगातला सुपरफास्ट स्मार्टफोन!

yuotophia
मुंबई : मायक्रोमॅक्सची सहाय्यक कंपनी ‘यू टेलिव्हेन्चर्स’ने आपला स्मार्टफोन ‘यूटोपिया’चा टीझर प्रदर्शित केला आहे. जगातील आत्तापर्यंतचा सर्वात सुपरफास्ट स्मार्टफोन ‘यूटापिया’ हा असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

मेटॅलिक बॉडीसहीत हा स्मार्टफोन बाजारात दाखल होणार आहे. त्याच्या कडांवर सध्या एक निळ्या रंगाची लाईटही दिसते आहे. मात्र कंपनीनेअद्याप या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत गुलदस्त्यातच ठेवली आहे. मात्र, हा जगातील सर्वात पॉवरफूल आणि सुपरफास्ट स्मार्टफोन असेल, असे ट्विट कंपनीच्या सीईओंनी केले आहे.

Leave a Comment